शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 17:50 IST

बुलडाणा: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १७७ प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १७७ प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. तर ११ कोटी २५ लाख ६२ हजार ६६८ रुपये कर्जाचे वितरण करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला असून यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना दुष्काळात आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचा आर्थिक विकास साधला जावा, यासाठी राज्यात अण्णसाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळांतर्गत राज्यभरातील बँकामध्ये कर्ज देण्याचे काम सध्या सुरू आहे. यंदा निर्माण झालेल्या दुष्काळामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध नाही. त्यामुळे अशा बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार उभारण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज अत्यंत फायद्याचे ठरत आहे. आतापर्यंत राज्यात १ हजार २९२ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले आहेत. तर ६८ कोटी ९७ लाख ५९ हजार १६२ रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून एकट्या बुलडाणा जिल्ह्यात १७७ कर्ज प्रकरणांना मान्यता देण्यात आली. यामुळे अनेक बेरोजगारांना दिलासा मिळत आहे. 

दोन हजारावर आॅनलाइन अर्जजिल्ह्यात आतापर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी २ हजार २५० अर्ज आले आहेत. त्यातील एक हजार ८०० पात्र ठरले असून १७७ कर्ज प्रकरणे मंजूर झाले आहेत.

राज्यात एक हजारावर कर्ज प्रकरणे राज्यात एक हजार २९२ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये पश्चिम विदर्भातील २२९ कर्ज प्रकरणांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात ३२, अमरावती ११, बुलडाणा १७७, वाशिम जिल्ह्यात सहा कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. तर राज्यातून सर्वात कमी कर्ज प्रकरणे करणारा जिल्हा यवतमाळ आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत केवळ तीन कर्ज प्रकरणे मंजूर आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा