शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा एलसीबीच्या वाहनाला अंबडजवळ अपघात; आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:56 IST

बुलडाणा: एका गुन्ह्याच्या तपासात बीड जिल्ह्यात गेलेल्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला परतीच्या प्रवासात जालना जिल्हय़ातील अंबड तालुक्यात येत असताना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर  अंकुशनगरजवळ  शनिवारी रात्री अपघात झाला. यामध्ये सात पोलीस कर्मचार्‍यांसह एक ऊसतोड कामगार असे आठ जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देगुन्हय़ाच्या तपासासाठी गेले होते बीडला जालन्यात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एका गुन्ह्याच्या तपासात बीड जिल्ह्यात गेलेल्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला परतीच्या प्रवासात जालना जिल्हय़ातील अंबड तालुक्यात येत असताना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर  अंकुशनगरजवळ  शनिवारी रात्री अपघात झाला. यामध्ये सात पोलीस कर्मचार्‍यांसह एक ऊसतोड कामगार असे आठ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, यातील दोघांना गंभीर मार लागला असून, त्यांच्यावर जालना येथील  खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे. जखमीमध्ये दोन महिला पोलीस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.या अपघातामध्ये बुलडाणा गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी इमरान इनामदार, चालक शेळके, पथकातील राजेश ठाकूर, अत्ताउल्लाखान  राजेश ठाकूर, महिला कर्मचारी आशा मोरे व खिल्लारे  जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जालना येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. एका कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. चिखली शहरातील डीपी रोडवर एका ज्वेलर्सच्या दुकानातून दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास झाली होती. २३ ऑक्टोबर २0१७ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी बीड जिल्हय़ातील गेवराई येथील एका महिलेस अटक केली होती. दरम्यान, फरार दोन महिलांच्या शोधासाठी पथक बीड जिल्हय़ामध्ये गेले होते.  संबंधित आरोपी महिला न मिळाल्यामुळे एलसीबीचे पथक बुलडाण्याकडे (एमएच-२८-७२२७) वाहनाद्वारे परत येत असताना शनिवारी रात्री ११ वाजता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालुक्यातील अंकुशनगरजवळ कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नाच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट समोर असलेल्या ऊसतोडीच्या बैलगाडीला जाऊन धडकली. त्यात बैलगाडीचा मालक सुभाष कुराडे (रा. बळेगाव, ता. अंबड) सह वाहनातील सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ऊसामुळे गाडीची काच फुटून आतील कर्मचारी जखमी झाले आहेत. यात गाडीतील चालकासह तपास अधिकारी इमरान इनामदार गंभीर जखमी झाले. इमरान इनामदार यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दखापत झाली असून चालक शेळके, पथकातील राजेश ठाकूर, अत्ताउल्लाखान  राजेश ठाकूर, आशा मोरे, खिल्लारे यांनाही जबर मार लागला आहे. शहागड पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे.

इनामदार यांच्यावर शस्त्रक्रियागंभीर जखमी तपास अधिकारी इमरान इनामदार यांच्यावर जालना येथील नेत्ररुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी एका डोळ्यावर शस्त्रक्रिया संध्याकाळी ४.३0 वाजेदरम्यान करण्यात आली असून, दुसर्‍या डोळ्यावर उशिरा रात्री शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोबतच पथकातील इतर कर्मचार्‍यांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात