शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘समृद्धी’साठी सरळ खरेदीने जमीन घेण्यात बुलडाणा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 14:27 IST

बुलडाणा : विदर्भ आणि मुंबईला जोडणार्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी संपादीत करावयाच्या सात हजार २९० हेक्टर जमिनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे २८ जून पर्यंत संपादन झाले आहे. सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमीन खरेदी करून बुलडाणा जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

ठळक मुद्देजमीन संपादनाची टक्केवारी पाहता वाशिम जिल्हा राज्यात अव्वल असून ९२ टक्के जमीन या जिल्ह्यात संपादीत झाली आहे.समृद्धी महामार्गासाठी सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमिनीचे बुलडाणा जिल्ह्यात भूसंपादन करण्यात आले आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : विदर्भ आणि मुंबईला जोडणार्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी संपादीत करावयाच्या सात हजार २९० हेक्टर जमिनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे २८ जून पर्यंत संपादन झाले आहे. सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमीन खरेदी करून बुलडाणा जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात आता अवघे १३६ हेक्टर क्षेत्र संपादीत करावयाचे राहले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग थेट मुंबईला समृद्धी महामार्गाद्वारे जोडण्यात येणार आहे. हा मार्ग पुर्णत्वास गेल्यावर नागपूर-मुंबईचे अंतर कमी होऊन शेतकऱ्यांना थेट मुंबईमध्ये माल पोहोचवण्यासोबतच बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, जालना, ठाणे, अहमदनगरसह बहुतांश जिल्ह्यांच्या विकासाला तथा औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पावर मोठा जोर दिल्या गेला आहे. जमीन संपादनाची टक्केवारी पाहता वाशिम जिल्हा राज्यात अव्वल असून ९२ टक्के जमीन या जिल्ह्यात संपादीत झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८८ टक्के, नाशिक जिल्ह्यात ७७ टक्के, अमरावती जिल्ह्यात ९० टक्के, वर्धा जिल्ह्यात ८७ टक्के, ठाणे जिल्ह्यात ७४ टक्के, जालना ७७ टक्के, अहमदनगर ८५ टक्के आणि नागपूर जिल्ह्यातील ९३ टक्के जमीन समृद्धीसाठी संपादीत केली गेली आहे.

बुलडाण्यात सर्वाधिक खरेदया

एकट्या बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ८०६ खरेदया या सरळ खरेदीद्वारे झाल्या आहेत. त्यानंतर औरंगाबादमध्ये एक हजार ७५१ जणांच्या खरेदया झाल्या असून नाशिक जिल्ह्यामध्ये एक हजार ५८३जणांच्या जमिनीच्या सरळ खरेदी झाल्या आहेत. दहाही जिल्ह्यात आजपर्यंत १० हजार ५३० जणांची जमीन थेट खरेदीदर संपादीत करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गासाठी सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमिनीचे बुलडाणा जिल्ह्यात भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी स्थानी आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गbuldhanaबुलडाणाwashimवाशिम