शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव; नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:39 IST

हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

- ब्रह्मानंद जाधव

बुलडाणा: हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याची ओरड आजपर्यंत होती; मात्र जिल्ह्यात यावर्षी उलट चित्र आहे. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे. नोंदणी करूनही मूग, उडीदाची खरेदी आजही शुन्यावर आहे. तर सोयाबीनचीही केवळ नोंदणीच झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शासनाकडून शेतमालाचे हमीभाव ठरवून दिले जातात. परंतू नाफेड केंद्राकडे या हमीभावात शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी मोठी  कसरत करावी लागते. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून कमी दरामध्ये शेतमालाची खरेदी केल्या जाते. त्याचा फटका शेतकऱ्यांना नेहमी बसतो. परंतू यंदा याउलट परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना नाफेड केंद्रापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री करणे परवडत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राकडे सध्या शेतकरी फिरकतही नाहीत.

पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. मूग, उडीद घरतही आले नाही. हमीभाव कमी असल्याने शेतकरी नाफेडकडे येण्यास तयार नाही. हमीभाव वाढवणे आवश्यक आहे. -भागवत देशमुख, शेतकरी

हमीभावा पेक्षा व्यापाऱ्यांकडे जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांकडे माल विक्री करत आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी नाफेड केंद्र आहेत.       नोंदणी केलेल्यांना अद्याप माल आणला नाही.

-नंदकुमार खडके, अध्यक्ष, तालुका खरेदी विक्र संघ, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती