बुलडाणेकरांनी अनुभवला दाजिर्लिंगचा ‘फिल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:39 PM2019-12-27T15:39:34+5:302019-12-27T15:39:39+5:30

बुलडाणा : हवामान बदलाच्याबाबतीत अकिलकीडील काळात बुलडाणा जिल्हा हा संवेदनशील बनल्याचे सांगितले जात असतानाच बुलडाणा जिल्ह्यात त्याचे अलिकडील काळात ...

Buldhana experience Dajirling's 'Phil'! | बुलडाणेकरांनी अनुभवला दाजिर्लिंगचा ‘फिल’!

बुलडाणेकरांनी अनुभवला दाजिर्लिंगचा ‘फिल’!

Next

बुलडाणा: हवामान बदलाच्याबाबतीत अकिलकीडील काळात बुलडाणा जिल्हा हा संवेदनशील बनल्याचे सांगितले जात असतानाच बुलडाणा जिल्ह्यात त्याचे अलिकडील काळात दृश्यपरिणामही समोर येत आहे. गुरूवारी बुलडाणा शहरात दाट धुक्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला.
सकाळी ११ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर असलेल्या या धुक्यामुळे नजरेच्या टप्प्यातील जवळच्या वस्तूही पाहणे अवघड झाले होते तर तापमापीचा पाराही १८ अंश सेल्सिअसवर स्थिरावला होता. त्यामुळे दार्जिलिंगसारख्या एखाद्या हिलस्टेशनवर तर आपण नाहीत ना, अशी जाणिव बुलडाणेकरांना होत होती.
गेल्या आठवड्यातच बुलडाण्याचे यावर्षीचे निच्चांकी तापमान (१५.४) गेल्या मंगळवारी नोंदविल्या गेले होते. त्यानंतर गुरूवारी पुन्हा बुलडाणेकरांची पहाट ही बाष्पयुक्त धुक्याच्या जाणिवेने झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत हे दाट धुके पसरलेले होते. बुलडाणा शहरात या धुक्यामुळे दृष्यता ही अवघी दहा मिटरच्या आसापास असल्याचे दिसून आले. त्यामुळे मार्गावरील वाहनेही दुपारपर्यंत संथ गतीने धावत होती. दार्जिलिगींच्या एक तृतियांश अर्थात दोन हजार १९० फुट उंटीवर बुलडाणा शहर आहे. त्यामुळे येथे तसे थंड वातावरण राहते. मात्र अलिकडील काळात बदलत्या हवामानामुळे येथे गारवा अधिकच वाढला आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून तापमानाती चढउतार व्यापक प्रमाणावर होत असून त्यातूनच दिवसाची सरासरी तापमान कक्षा बदलत आहे. त्यातून असे प्रकार घडत आहे. अलीकडील काळात समुद्री वाऱ्यांच्या दिशेत झालेल्या बदलामुळे तापमानातील तफावात आणि हवामानातील बदल अनुभवल्या जात असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे असे बदल दिसून येत असल्याचे कृषी विभागातील एका अधिकाºयाने सांगितले.

Web Title: Buldhana experience Dajirling's 'Phil'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.