शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: काेतवाल परीक्षेत आढळला डमी उमेदवार, पर्यवेक्षकांच्या समयसुचकतेने प्रकार उघडकीस

By संदीप वानखेडे | Updated: October 22, 2023 21:27 IST

Exam Copy News: विविध स्पर्धा परीक्षांमध्ये डमी उमेदवार आढळल्याचे प्रकार राज्यभरात समाेर आले हाेते़ त्यानंतर बुलढाण्यातही काेतवाल पदाच्या परीक्षेसाठी चक्क डमी उमदेवारच परीक्षा देण्यासाठी आला हाेता.

- संदीप वानखडेबुलढाणा -  विविध स्पर्धा परीक्षांमध्ये डमी उमेदवार आढळल्याचे प्रकार राज्यभरात समाेर आले हाेते़ त्यानंतर बुलढाण्यातही काेतवाल पदाच्या परीक्षेसाठी चक्क डमी उमदेवारच परीक्षा देण्यासाठी आला हाेता़ एवढेच नव्हे तर त्याने बनियनला खिसा शिवून त्यामध्ये माेबाइल आणला हाेता़ पर्यवेक्षकांना संशय आल्याने त्याची झाडाझडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला़ या प्रकरणी आराेपी युवकाविरुद्ध बुलढाणा शहर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

बुलढाणा शहरातील सहकार विद्या मंदिर या परीक्षा केंद्रावर ५६७ परीक्षार्थी पेपर देणार होते़ परंतु परीक्षा देण्यासाठी प्रत्यक्षात ५४३ उमेदवार हजर होते. या केन्द्रावरील रूम नंबर २० मध्ये हिवताप कार्यालयातील लिपिक मनोज जगताप हे परीक्षा समवेक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत होते. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना वेळेच्या आत उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले़ परंतु गणेश भगवान चनखोरे असा हॉल टिकीट घेऊन एक उमेदवार एन वेळेवर आला व परीक्षा देण्यास सुरुवात केली़ त्याच्या हालचालीवर समवेक्षक मनोज जगताप यांना संशय आल्याने त्यांनी त्याची तपासणी केली असता त्याने बनियानमध्ये खिसा शिवून त्यात मोबाइल लपवून आणला होता़ जेव्हा त्याचे हॉल टिकीट तपासले असता त्यावर फोटो दुसऱ्या व्यक्तीचा होता. त्याला पकडून केंद्र संचालक यांच्याकडे आणले असता त्याने आपले नाव विजयसिंह महासिंह सुंदरडे रा. राजेवाडी, ता़ बदनापूर, जि.जालना असे सांगितले.या प्रकरणी आराेपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास एपीआय जयसिंग राजपूत करीत आहेत़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा