शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा : प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांअभावी अग्नीशामक वाहने हाताळताना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 14:58 IST

मेहकर :  जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे.

ठळक मुद्दे यंत्रणेवर झालेला खर्च पाहता उपलब्ध साधने धुळखात पडल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.शासन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षीतपणामुळे अग्नीश्यामक दलातील रिक्तपदांची भरतीच झालेली नसल्याने आपतकालीन यंत्रणा हाताळताना समस्या निर्माण होत असल्याचा आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला आहे.आग विझवण्यासाठी मेहकर सह जिल्ह्यातील प्रत्येक नगर पालीकेला २०१२ -१३ मध्ये शासनाने कोट्यवधीरुपये खर्च करून अधुनिक वाहने उपलब्ध करून दिली.

- उद्धव फंगाळ मेहकर :  जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे. त्यामुळे या यंत्रणेवर झालेला खर्च पाहता उपलब्ध साधने धुळखात पडल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. दुसरीकडे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षीतपणामुळे अग्नीश्यामक दलातील रिक्तपदांची भरतीच झालेली नसल्याने आपतकालीन यंत्रणा हाताळताना समस्या निर्माण होत असल्याचा आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला आहे.    उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शॉटसर्किट सह अन्य कारणांमुळे ठिकठिकाणी आगी लागण्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. आग विझवण्यासाठी मेहकर सह जिल्ह्यातील प्रत्येक नगर पालीकेला २०१२ -१३ मध्ये शासनाने कोट्यवधीरुपये खर्च करून अधुनिक वाहने उपलब्ध करून दिली. मात्र अत्यावश्यक मनुष्यबळच उपलब्ध पाच ते सहा वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे मेहकर येथील ही वाहने शोभेची वस्तू बनल्या आहेत. शहरामध्ये तथा ग्रामीण भागात एखाद्या कारणाने आग लागल्यास सदर आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाची उपलब्धता करून देण्यात येते. मात्र सर्व सुविधा असतांनाही केवळ कर्मचाºयांची भरती नसल्याने अग्नीशमनच्या गाड्या वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही. गाडी जर वेळेवर आली नाही तर खाजगी पाण्याचे टॅकर मागवून आग विझवण्यात येते. शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून ही आवश्यक मनुष्यबळ का उपलब्ध करून दिले जात नाही, हा प्रश्न आहे. मेहकर पालिकेला अग्नीशमनची नविन गाडी मिळालेली आहे. या गाडीवर ८ कर्मचाºयांची पदे मंजुर आहेत. यामध्ये १ चालक ४ फायरमन, १ पर्यवेक्षक, २ सहाय्यक पर्यवेक्षक अशी ८ पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला मात्र ही यंत्रणा अद्यापही प्रभावीपणे कार्यान्वीत झालेली नाही. त्यामुळे मेहक उपविभागात आपतकालीन स्थितीत मदत कार्यकरण्यात प्रसंगी मोठ्या अडचणी जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या जागा त्वरेने भरण्यात याव्यात अशी मागणी होत असून खा. प्रतापराव जाधव यांनीही प्रशासनाने प्रकरणी दिरंगाई न करता यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वीत करावी, अशी मागणी केली आहे. अग्नीशमन विभाग हा अत्यावश्यक सेवेमध्ये येतो. या विभागातील रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरण्यासाठी  पालिका मुख्याधिकारी यांना सुचना केल्या आहेत.

डॉ. नीलेश अपार, एसडीओ, मेहकर

 अग्नीशमन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत पालिकास्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच हे कार्य पूर्णत्वास जाईल.

  - अशोक सातपुते,   मुख्याधिकारी, मेहकर पालिका

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरfireआग