शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा : आलेवाडी सिंचन प्रकल्पातील शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:33 IST

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे  प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे.

ठळक मुद्दे या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार असल्यामुळे विरोध.संग्रामपूर तालुक्यामधील सर्वात जास्त सुपीकच बागायत शेत जमीन ही याच परिसरात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नामंजुर करावा, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांकडून होत आहे.

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे  प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. हा प्रकल्प या परिसरात झाल्यास या प्रकल्पात हजारो आदिवासी बांधवांच्या संत्राच्या बागा नष्ट होवून हा प्रकल्प येथे होणार आहे. तसेच हा प्रकल्प येथे झाल्यास आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही येथे उपस्थित होणार असून या प्रकल्पामुळे ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार असल्यामुळे या प्रकल्पाचा आदिवासी बांधवांचा तीव्र विरोध होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नामंजुर करावा, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांकडून होत आहे. ज्याठिकाणी हा आलेवाडी सिंचन प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याठिकाणी आज सुमारे दीड लाख पेक्षाही जास्त प्रमाणात संत्र्याची फळबाग आहे. तसेच याच परिसरात ९५ टक्के आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. तसेच संग्रामपूर तालुक्यामधील सर्वात जास्त सुपीकच बागायत शेत जमीन ही याच परिसरात असल्यामुळे याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आल्यास ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार आहेत. त्यामुळे सुरूवातीपासूनच या प्रकल्पाला आदिवासी बांधवांचा तीव्र विरोध होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे काम थांबवुन हजारो आदिवासी बांधवांना न्याय द्यावा व भूमिहीन होणाºया आदिवासी बांधवांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आलेवाडी सिंचन प्रकल्पात बाधित होणाºया आदिवासी बांधवांकडून व्यक्त होत आहे. आदिवासींना देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असून आमची मौल्यवान बागायती जमीन हिरावून घेणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी आमची आदिवासी बांधवांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. - सत्तार भिकन केदार, शेतकरी आलेवाडी

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण