शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा : दोन वेगवेगळय़ा अपघातात बीएसएफच्या जवानांसह आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:42 IST

सावत्रा/नांदुरा : रविवारी बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातामध्ये बीएसएफच्या तीन  जवानांसह आठ जण जखमी झाले. पहिला अपघात हा जानेफळ नजीक घडला. त्यात जालना जिल्हयातील कारमधील पाच जण जखमी झाले. तर दुसरा अपघात नांदुरा शहरानजीक कोलासर फाट्याजवळ घडला. यामध्ये ट्रकने बीएसएफच्या गाडीला धडक दिल्याने त्यातील तीन जवान जखमी झाले.

ठळक मुद्देभरधाव कार झाडावर आदळी जालना जिल्ह्यातील पाच जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कसावत्रा/नांदुरा : रविवारी बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळय़ा अपघातात बीएसएफच्या तीन  जवानांसह आठ जण जखमी झाले. पहिला अपघात हा जानेफळ नजीक घडला. त्यात जालना जिल्हयातील कारमधील पाच जण जखमी झाले. तर दुसरा अपघात नांदुरा शहरानजीक कोलासर फाट्याजवळ घडला. यामध्ये ट्रकने बीएसएफच्या गाडीला धडक दिल्याने त्यातील तीन जवान जखमी झाले.जानेफळ नजीकच्या घटनेत शेगाव येथे दर्शनासाठी जाणार्‍या कारला (एमएच-२१-एएक्स-२९४८) अपघात होऊन जालना जिल्ह्यातील मंठा येथील पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी नऊ वाजता झाला. त्यात सोपान विठ्ठल राठोड, सुशील विठ्ठल राठोड, कमल विठ्ठल राठोड, शीतल सोपान राठोड आणि कार चालक मिथुन पांडुरंग चव्हाण (सर्व रा. मंठा) हे जखमी झाले आहेत. मंठा येथून शेगाव येथे ते दर्शनासाठी जात होते. दरम्यान, जानेफळ नजीक तीन किमी अंतरावर मोसंबेवाडीच्या कॅनॉलवरील पुलावरील खड्ड्यातून गाडी कुदल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या डाव्या वाजूला सुमारे ६० मीटर फरफटत जावून शेतातील धुर्यालगत असलेल्या लिंबाच्या  झाडावर आदळी. खामगावच्या दिशेने असलेले कारचे तोंड त्यामुळे चक्क मेहकरकडे झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या अपघातामध्ये उपरोक्त जखमींना गंभीर इजा झालेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झालेले आहे.अपघाताला खड्डा कारणीभूतमोसंबेवाडीनजीकच्या कॅनॉल पुलावर न दिसणारा सपाट खड्डा तयार झाला आहे. वाहन मेहकरकडून भरधाव आल्यानंतर या खड्ड्यामुळे उंच उडते आणि नियंत्रण सुटून असे अपघात होत असल्याची स्थानिकांची ओरड आहे. गेल्या आठ दिवसामध्येया ठिकाणी डोणगाव येथील एक कार, एक विटांचा ट्रक यांना अपघात झालेले आहेत.

नांदुरा : ट्रकची बीएसएफच्या वाहनाला धडकयेथून जवळच असलेल्या कोलासर फाट्याजवळ मागून येणाºया ट्रकने बीएसएफच्या गाडीला धडक दिल्याने त्यातील तीन जवान जखमी झाल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली.याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदुरा कडून मलकापूरकडे जात असताना कोलासर फाट्याजवळ काही काळ ट्राफीक जाम झाली होती. त्यामुळे गाड्यांच्या रांगा लागल्या असताना तिथे बीएसएफची गाडी क्र. पीपी ०८ बीए ९३४४ ही उभी असताना मलकापूरकडून येणारा ट्रक क्र. एचआर ४६ डी ९६६० च्या चालकाने आपली गाडी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरच्या बीएसएफच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे गाडीमध्ये बसलेले बीएसएफ जवान जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचार केल्यानंतर ते इंदोरकडे रवाना झाले. याबाबत बीएसएफ जवान शंकरआप्पा मोहनचा मट रा.चाकुर जि.लातुर यांच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाJanephal chowk mehkarजानेफळ चौक मेहकर