शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

बुलडाणा जिल्ह्यात लाचखोरीत महसूल, पोलीस विभाग वरचढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:29 AM

बुलडाणा : शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांचे खिसे भरल्याशिवाय कुठलीही कामे होत नाही, हे लाचखोरीच्या वाढत्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये शासनाच्या विविध विभागात सापळा प्रकरणे  व अन्य भ्रष्टाचाराचे २० प्रकरणे समोर आली असून, लाचखोरीमध्ये महसूल व पोलीस विभाग वरचढ ठरत आहे.  

ठळक मुद्देजिल्ह्यात २० लाचखोरीची प्रकरणे लाचखोरीचे प्रमाण वाढते

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांचे खिसे भरल्याशिवाय कुठलीही कामे होत नाही, हे लाचखोरीच्या वाढत्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये शासनाच्या विविध विभागात सापळा प्रकरणे  व अन्य भ्रष्टाचाराचे २० प्रकरणे समोर आली असून, लाचखोरीमध्ये महसूल व पोलीस विभाग वरचढ ठरत आहे.  भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी सामान्य नागरिक समोर येत असल्याने अधिकारी व कर्मचाºयांकडून लाच मागण्याचे प्रकरणही चव्हाट्यावर येत आहे. शासनाच्या ठरावीक काही विभागामध्ये कुठलेही काम अधिकाºयांचे खिसे गरम केल्याशिवाय होत नसल्याचा अनुभव काहींचा आहे. अशा लाचखोर अधिकाºयांचा पर्दाफाश करण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात जानेवारी २०१७ पासून आतापर्यंत जवळपास २० गुन्हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समोर आणले आहेत. त्यामध्ये सापळा प्रकरणे अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराचे गुन्हे समोर आले आहेत. लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरांना रंगेहात पकडूनही लाचखोरीचे प्रमाण वाढतच आहे. सापळा प्रकरणांमध्ये सध्या महसूल व पोलीस विभाग आघाडीवर आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या सापळा कारवाईमध्ये परिवहन महामंडळच्या बुलडाणा विभागीय कार्यालयाचे विभाग नियंत्रकच अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर वर्षभरात झालेल्या कारवाईमध्ये अनेक वर्ग एकच्या अधिकाºयांचाही समावेश दिसून येतो. सात-बारामध्ये वारसाचे नाव कमी करून त्यांच्या नावे हक्क देण्यासाठी निबंधक कार्यालयाच्या अधिकाºयाकडून लाच घेतल्याचा प्रकार समोर आला होता.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे लाच मागण्याच्या बाबतीत भ्रष्ट अधिकारी व कर्मचाºयांची लाचखोरी वाढतच असल्याचे दिसून येत आहे. 

लाचखोरांना शिक्षेचे प्रमाण २६ टक्के!जिल्ह्यात लाचलुचपत प्रकरणात झालेल्या कारवायांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण २६ टक्क्यांच्या जवळ पोहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुदर्शन मुंडे उपअधीक्षक असताना जिल्ह्यात लाचखोरांविरोधात धडक कारवाई सुरू झाली होती. त्यांचाच कित्ता वर्तमान उपअधीक्षक शैलेश जाधव गिरवत असून, लाचखोरांवर वचक निर्माण झाला आहे. 

बड्या अधिकाºयांवरही कारवाईबुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत आलेल्या आर्थिक वर्षात धडक कारवाई करीत जिल्ह्यात बड्या अधिकाºयांनाही सोडले नाही. राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. यासोबतच मलकापूर, खामगाव, मेहकरसह अन्य ठिकाणी विभागाने सापळे यशस्वी करून आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. 

‘एसीबी’कडे आधुनिक यंत्रणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने कारवाई करताना बारकाईने सापळा रचल्या जात आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही यंत्रणेकडून खुबीने वापर केला जात आहे. परिणामस्वरूप जिल्ह्यातील सापळे यशस्वी होत असल्याचे चित्र आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा