शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातून वर्षभरात ५८९ व्यक्ती बेपत्ता, ३३५ जणांना शोधण्यास पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:29 IST

खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्या. डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती विचार करायला लावणारी आहे.सैलानी यात्रेदरम्यान सर्वाधिक वाढत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

- भगवान वानखेडे खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. यापैकी ३३५ व्यक्ती मिळाल्याची सकारात्मक बाब जरी समोर येत असली तरी मात्र डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती विचार करायला लावणारी आहे.घरी कुणालाच काही न सांगता शौचास जातो म्हणुन निघून जाणे, शेतात गेला आणि पुन्हा परतलाच नाही, मित्रांक डे, नातेवार्इंकाडे गेला होता पण आढळून आला नाही अशा अनेक तक्रारी घेऊन बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक पोलिस स्टेशनला तक्रारी देतात. यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही संख्या जिल्ह्यातील सैलानी यात्रेदरम्यान सर्वाधिक वाढत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.डिसेंबर महिन्यात तब्बल ९० व्यक्ती बेपत्तामागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात जिल्ह्यातून ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. एकाच महिन्यात जिल्ह्यातून ९० व्यक्ती बेपत्ता होणे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायला लावणारे आहे. वर्षभरात ५८९ व्यक्ती बेपत्ता जरी झाल्या असल्या तरी ३३५ व्यक्ती शोधण्यात पोलिसांना यश आहे. यापेक्षाही अधिक व्यक्ती घरी परतलेल्या असतात परंतु हरवल्याची तक्रार दिली जाते परंतु घरी परत आल्याची माहिती दिली जात नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली आहे.आॅपरेशन मुस्कान लाभदायीपोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला आॅपरेशन मुस्कान राबवण्यात येत आहे. यासाठी एक विशेष पथक ही तयार करण्यात आले आहे. या पथकाला बेपत्ता व्यक्ती शोधण्यात येत असून आगामी काळात हे आॅपरेशन आणखीन गतीमान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.कुटूंबातील व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार पटकन दिली जाते, परंतु त्या तुलनेत मात्र आढळून आल्याची माहिती पोलिस स्टेशनला दिली जात आहे. मात्र नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रारीबरोबरच आढळून आल्याची माहितीही द्यावी.-संदिप डोईफोडे, अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावPoliceपोलिस