शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा : ५१ गावांतील पाणी पुरवठा योजना बनल्या शोभेच्या वास्तू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:48 IST

डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला असून, १ ते ६ जानेवारीदरम्यान सहा दिवसांत ५८ गावांना भेटी देऊन तेथील गावकर्‍यांशी संवाद साधीत शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेचे विदारक चित्र जाणून घेतले. 

ठळक मुद्देशासकीय पाणी पुरवठा योजनांची माजी राज्यमंत्र्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला असून, १ ते ६ जानेवारीदरम्यान सहा दिवसांत ५८ गावांना भेटी देऊन तेथील गावकर्‍यांशी संवाद साधीत शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेचे विदारक चित्र जाणून घेतले. जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सहा दिवसांत ५८ गावांपैकी जवळपास ५१ गावांमध्ये गावकर्‍यांना नळ योजनेद्वारे पाणीच मिळत नसल्याचे दिसून आले, तर ६ जानेवारी रोजी सुबोध सावजी यांनी डोणगाव येथील साडेचार कोटींच्या नळ योजनेची पाहणी केली. यावेळी योजनेचा केवळ सांगाडा उभा होता, तर नळ योजनेतून पाणी येत नव्हते. ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या नळ योजनेतून महिन्यात चार वेळा डोणगावला पाणी मिळत असून, साडेचार कोटी रुपये खचरूनही अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचारामुळे डोणगावला पाणी नाही व वरून वाढीव योजनेची मागणी या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन सायंकाळी ५ वाजता माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आठवडी बाजरात सभा घेऊन जनतेला अधिकार्‍यांनी प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती देऊन जनतेचे हाल पाण्याअभावी कसे होत आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर जळगाव जामोद, संग्रामपूर या भागातील दौरा करणार असल्याचे सांगून समाजकारणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.  या कार्यक्रमाला काँग्रेस नेते शैलेश सावजी, नामदेव काळे, अबरार खान मिल्ली, जितेंद्र अंबेकर, रहीम खान, उस्मान शाह, श्याम इंगळेंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शैलेश सावजी यांनी डोणगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेची माहिती देऊन या गावात वॉर्ड क्रमांक दोनमध्ये नळ योजनेला पाणी नसताना ही पाइपलाइन खोदण्यात आली. एवढा मोठा भ्रष्टाचार असताना या योजनेसाठी वाढीव पैसा मागण्यात आला. हा कशासाठी ३0 वर्षांपूर्वीच्या योजनेतून महिन्यात एकदा पाणी मिळते, अशी माहिती दिली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी