शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana Crime : दरोड्यासह मोठ्या घातपाताचा कट उधळला; सात जणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 12:30 IST

Buldhana Crime त्यांच्याकडे लोखंडी हत्यारे असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिलाली होती.

ठळक मुद्देमेहक पोलिसांनी सुलतानपूर नजीक सात जणांना पकडले. एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

 लाेकमत न्यूज नेटवर्कमेहकर/सुलतानपुर : दरोड्यासह बनावट सोने विक्री प्रकरणातील संदिग्ध असल्याच्या संशयावरून मेहकर पोलिसांनी सुलतानपूर नजीक सात जणांना पकडले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, या आरोपीकडून एक चार चाकी वाहनासह १ लाख नऊ हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर येत आहे.शुक्रवारी दुपारी मेहकर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे दरोड्यासह मोठ्या घातपाताचा कट मेहकर पोलिसांनी उधळला असल्याचे समोर येत आहे. मेहकर-सुलतानपूर मार्गावर एका पुलानजीक एक चारचाकी (एमएच-१४-बीसी-९९१) क्रमांकाचे वाहन संशयितरित्या उभे असून त्यांच्याकडे लोखंडी हत्यारे असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिलाली होती. अनुषंगीक माहितीची खात्री करण्यासाठी ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर सानप, पोलिस कॉन्स्टेबल निवृत्ती सानप, गणेश लोढे, राजेश उंबरकर, विजय आंधळे यांनी दोन पंचासह जावून संदिग्ध वाहनाची पाहणी केली असता  त्यातील तीन आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोन जणांना ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला. संदिग्दांची विचारपूस केली असता बळीराम पुंडलीक चव्हाण (५५), रविंद्र  प्रभू भोसले (२८), राष्ट्तारपाल देवानंदजाधव (२६, सर्व. रा. दधम, ता. खामगाव), आकाश माणिकराव चव्हाण (१८), दिलीप ज्ञानेश्वर चव्हाण (२२, रा. लाखनवाडा), सतिष मोहन पवार (१९, रा. जयरामगड) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा यात समावेश आहे. दरम्यान, पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव गणेश राठोड असून तो खामगाव तालुक्यातीलच लाखनवाडा येथील रहिवासी असल्याचे समजते.प्रकरणी पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता  त्यात पाच मोबाईल, दोन लोखंडी रॉड, एक लोखंडी पाईप, मिरची पावडर, दोन देसी दारूच्या बाटल्या, पिवळ्या धातुच्या गिन्न्याचे (नकली सोने) एकूण  ६३० ग्रॅम वजनाचे ४०५ नग व वाहन असा एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिस करीत आहेत. एखाद्या मोठ्या गुन्ह्याच्या तयारी हे संदिग्ध मेहकर, सुलतानपूर परिसरात फिरत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

टॅग्स :MehkarमेहकरCrime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा