शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: रक्षा विसर्जनासाठी जात असलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला, टिप्परच्या धडकेत दाेघांचा मृत्यू

By संदीप वानखेडे | Updated: July 3, 2023 14:32 IST

Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असून २५ मृतदेहांची अग्नी जळत नाही ताेच आणखी एक अपघात घडला आहे़ भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी जात असलेले दाम्पत्य ठार झाले.

- संदीप वानखडेडाेणगाव -  बुलढाणा जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असून २५ मृतदेहांची अग्नी जळत नाही ताेच आणखी एक अपघात घडला आहे़ भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी जात असलेले दाम्पत्य ठार झाले. ही घटना ३ जुलै राेजी सकाळी १० वाजता लाेणीगवळी ते जानेफळ रस्त्यावर घडली. देविदास भिवसन पवार (वय ५०) व इंदुबाई देविदास पवार (वय ४६, रा. माेहना ता. मेहकर) अशी मृतांची नावे आहेत.

माेहना येथील देविदास पवार व त्यांची पत्नी इंदुबाई पवार हे दुचाकी क्र. एमएच २८ बीडी ७६१९ ने विश्वी येथील नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी जात हाेते. दरम्यान, मागून भरधाव येत असलेल्या टिप्पर क्रमांक  एमएच २८ बीबी ५७२२ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण हाेती की, दाेघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालकाने पळ काढला. त्यानंतर संतप्त जमावाने टिप्परची ताेडफाेड केली. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पाेलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण पोलिस अंमलदार पवन गाभणे, शंकर तांबेकर व चौगुले यांनी घटनास्थळावर धाव घेतली़ तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील शवागारात पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा