शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातातील मृतांची ओळख पटली; हिंगोलीतील बसमालक, चालकासह सहा जणांचा समावेश

By सदानंद सिरसाट | Updated: July 29, 2023 11:10 IST

अमरनाथवरून हिंगोलीला जाणाऱ्या लक्झरी बसला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या लक्झरी बसने समोरून धडक दिल्याने ती बस चिरत गेली

खामगाव - मलकापूर  (बुलढाणा) : दोन लक्झरी बसेसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत आतापर्यंत मृतांचा आकडा सहावर पोहचला आहे. त्यामध्ये बसमालक, चालकासह सहाही जण हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालय, मलकापुरातील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मलकापूर नजिकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाणपूलावर शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर चक्का जाम झाला होता.

अमरनाथवरून हिंगोलीला जाणाऱ्या लक्झरी बसला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या लक्झरी बसने समोरून धडक दिल्याने ती बस चिरत गेली. या भीषण अपघातात आधी ५ त्यानंतर उपचारादरम्यान एक असे सहा जण ठार झाले. तर २४ जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी अत्यवस्थ ५ जणांना बुलढाणा हलविण्यात आले. आहे.

मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव येथील बालाजी तीर्थ यात्रा कंपनी टूर अँण्ड ट्रँव्हल्सचे मालक शिवाजी धनाजी जगताप, चालक संतोष आनंदराव जगताप, दोघेही रा. भांडेगाव, आचारी अर्चना गोपाल घुकसे, सचिन शिवाजी महाडे, दोघेही रा. लोहगाव, तर प्रवाशी राधाबाई सखाराम गाढे, रा. जयपूर ता. हिंगोली, कानोपात्रा गणेश टेकाळे, रा. सिंधीनाका हिंगोली यांचा समावेश आहे.

जखमी प्रवाशांची नावे

विक्रांत अशोकराव समरित (२८), अमरावती, गणेश शिवाजी जगताप, (३८), भांडेगाव, संतोष भिकाजी जगताप (४३), हिंगोली, बद्रीनाथ संभाजी कराळे (५२), बबिता एकनाथ कराळे (५२), गिरीजाबाई बद्रीनाथ कराळे (५०), रा. दिग्रज, जि. हिंगोली, गंगाराम दत्तात्रय गिते, (६३), सिंधीनाका, हिंगोली, महादेव संबा रणवले (४०), खंडाळा, भागवत पुंजाजी फालके (२६), जयपूर वाडी, पार्वताबाई डोखले (३५), सिंधीनाका, किसन नामाजी पसारे (६०), भगवान नारायण गिते (४८), सिंधी नाका, द्वारकाबाई गजानन ढोकले (३०), हनुमान संभाजी फालके (२६) जयपूर वाडी, राधानाथा रामभाऊ घुकसे (३२), हिंगोली, मोनिका विष्णू घुले (३०) रा. लोहगाव, लिलाबाई एकनाथ आसोले (४८), गणेश शिवाजी जगताप (३८), संगिता शैलेंद्र पोतदार (५२), नागपूर, तर किरकोळ जखमींमध्ये उज्वला संजय नगराळे (५१), हर्षदा संजय नगराळे (३१), संजय किसन नगराळे (६०) सर्व रा. नागपूर, मारोती पूंजाजी जाधव (६८) चिखला, प्रगती दीपक किशोर (२३), नवनगर धुळे, काशिराम महाजी गिते (६०), सिंधीनाका हिंगोली, लक्ष्मीकांत सुभाष अथिलकर, अचलपूर.

टॅग्स :Accidentअपघात