शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : लाचखोर पोलिसांना जामीन मंजूर; पण जिल्हा सोडण्यास मनाई! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 01:37 IST

बुलडाणा: सात हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलिस हेडकॉन्स्टेबलला बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे; मात्र न्यायालय आणि तपासी अधिकार्‍यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना जिल्हा सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देन्यायालय, तपासी अधिकार्‍यांची परवानगी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सात हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलिस हेडकॉन्स्टेबलला बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे; मात्र न्यायालय आणि तपासी अधिकार्‍यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना जिल्हा सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. गौण खनिज वाहतुकीच्या मोबदल्यात हप्ता म्हणून ७ हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे, सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव खांडेकर आणि मोहम्मद इस्तीयाज यांना रंगेहात अटक केली होती. मोहम्मद इस्तीयाज याने पैसे स्वीकारले, तर ठाणेदार अंबादस हिवाळे यांनी ते घेऊन खिशात टाकले होते. सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव खांडेकर याच्या भ्रमणध्वनीवरून या प्रकरणात तक्रारदार असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला होता. त्यामुळे त्यालाही यात अटक करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी दुपारी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी तपासात सहकार्य करणे, पोलीस ठाण्यातील कर्मचारी तथा साक्षीदारांना न धमकावणे आणि न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय तथा तपासी अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय जिल्हा सोडून जाण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. 

मुख्यालय बदलण्याचे संकेतलाचेच्या प्रकरणात अटकल्यानंतर या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन आणि मुख्यालय बदलणे गरजेचे आहे. वृत्त लिहीपर्यंत जिल्हा पोलीस दलाने त्यासंदर्भात हालचाल केलेली नव्हती. त्यामुळे तीनही आरोपी पोलिसांचे सध्याचे कर्तव्याचे ठिकाण हे लगोलग बदल्या जाण्याचे संकेत आहेत.

न्यायालयाची पूर्व परवानगी आणि आयओच्या परवानगीशिवाय या तिघांनाही जिल्हा  सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. सोबतच साक्षीदारांना न धमकावणे आणि पोलिसांना तपासात सहकार्य  करावे या प्रमुख मुद्दय़ाच्या आधारावर जामीन मंजूर झाला आहे. यासंदर्भातील न्यायालयाची ऑर्डर उद्या मिळणार आहे.- ईश्‍वर चव्हाण, पोलीस निरीक्षक, एसीबी, अकोला 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हाCourtन्यायालय