शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बुलडाणा : माळवंडी दरोडा तपासासाठी चौथ्या पथकाची नियुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:41 IST

बुलडाणा :  तालुक्यातील माळवंडी येथील दरोडा प्रकरणाच्या तपासामध्ये रायपूर पोलीस गोपनियता बाळगत असून, आरोपींच्या शोधासाठी चौथ्या पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देतपासामध्ये रायपूर पोलिसांची गोपनियता

बुलडाणा न्यूज नेटवर्कबुलडाणा :  तालुक्यातील माळवंडी येथील दरोडा प्रकरणाच्या तपासामध्ये रायपूर पोलीस गोपनियता बाळगत असून, आरोपींच्या शोधासाठी चौथ्या पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे.माळवंडी येथे २५ मार्च रोजी सोने व्यापाºयाच्या निवासस्थानी सात ते आठ दरोडेखांनी दरोडा टाकून ११ लाख रुपयांचे सोने व नगदी ३५ हजार रुपये लंपास केले होते. प्रकरणाच्या तपासासाठी रायपूर पोलिसांची दोन व एक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त करण्यात आले होते. सैलानी येथील झोपड्यांचीही पोलिसांनी तपासणी केली होती. मात्र पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही. आता आरोपींच्या शोधासाठी गुन्ह्याची मोडस आॅपरेंटसीचा आधार घेत तपास सुरू असून, चौथ्या पथकाचीही तपासासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रायपूरचे सहायक पोलीस निरीक्षक जी. एन. सय्यद यांनी लोकमतशी बोलताना दिली.  पोलीस या प्रकरणाच्या तपासामध्ये गोपनियता पाळत असून, या प्रकरणाचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. प्रकरणाच्या तपासाचा तपशील देण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला.

तपासणी ठरली निष्फळ!२६ मार्च रोजी दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले होते. त्याने सैलानीकडे मार्ग दाखवला होता. त्यामुळे दरोडेखोरांच्या शोधात पोलिसांची दोन पथके सैलानी येथील झोपड्यांची तपासणी करीत होती. प्रदीर्घ काळ या झोपड्यांची तपासणी केल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा