शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेती हडपली सावकारी कायद्यातंर्गत तिघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 13:37 IST

आर्थिक अडचणीतून घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही शेतीचे नाममात्र खरेदीखत केल्याप्रकरणी तिघांविरोधात सावकारी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

खामगाव : आर्थिक अडचणीतून घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही शेतीचे नाममात्र खरेदीखत केल्याप्रकरणी तिघांविरोधात सावकारी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी ही कारवाई केली असून, आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यातील जळका तेली येथील नरेंद्र शंकरलाल गुप्ता यांनी प्रदीप मुरलीधर बोबडे यांच्याकडून आर्थिक अडचणीमुळे ३० हजार रुपये घेतले. या व्यवहारानुसार प्रदीप बोबडे यांनी गुप्ता यांची जळका तेली शिवारातील गट क्रमांक ३९ क्षेत्र २ हेक्टर ३३ आर ही नाममात्र खरेदी केली.

तर दुस-यांदा घेतलेल्या ४० हजाराच्या  गट क्रमांक ३९ क्षेत्र १ हेक्टर २१ आर या शेतीची नाममात्र दरात खरेदी केली. आर्थिक अडचणीतून घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही नरेंद्र गुप्ता यांच्या शेतीची परस्पर सौदाचिठ्ठी करण्यात आली. ही शेती मनिषा कैलास ढाकरे आणि यमुनाबाई शिवचरण चरपेयांनी १४ नोव्हेंबर २०१८ पूर्वी खरेदी केली. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्या चौकशी अहवालावरून अनिल सखाराम शास्त्री(४७) सहकारी अधिकारी श्रेणी सहा. निबंधक खामगाव यांनी खामगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी प्रदीप मुरलीधर बोबडे , मनिषा ढाकरे, यमुनाबाई चरपे यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल केला. सावकारी कायद्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

संमती न घेता शेतीच्या व्यवहाराप्रकरणी तिघांविरोधात सावकारी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांचा अहवाल प्राप्त असून, आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.- रफीक शेख पोलीस निरिक्षक, ग्रामीण पोलिस स्टेशन खामगाव.

टॅग्स :Farmerशेतकरी