शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
3
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
4
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
5
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
6
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
7
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
8
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
9
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
10
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
12
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
13
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
14
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
15
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
16
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
17
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
18
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
19
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
20
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं

बुलडाणा जिल्ह्यात  २८ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:26 IST

बुलडाणा : ऐन मोसमात सव्वा महिन्याची उघडीप दिलेल्या  पावसाने परतीचा प्रवास लांबविला आहे. त्याचा शेतीला फायदा  झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप २८.५३ टक् क्यांच्या आत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे  असून पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगाम धोक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार!

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ऐन मोसमात सव्वा महिन्याची उघडीप दिलेल्या  पावसाने परतीचा प्रवास लांबविला आहे. त्याचा शेतीला फायदा  झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप २८.५३ टक् क्यांच्या आत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे  असून पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला.  जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तिन मोठय़ा  प्रकल्पात पावसाळ्यापूर्वी 0४.४५ टक्के जलसाठा होता. आता  २३.८0 टक्के जलसाठा आहे. तर पलढग, ज्ञानगंगा, मस,  कोराडी, मन, तोरणा व उतावळी या ७ मध्यम प्रकल्पात एका  महिन्यापूर्वी १६.११ टक्के जलसाठा होता. आता ४१.८९ टक्के  जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत.  यामध्ये एका महिन्यापूर्वी १२.0३ टक्के जलसाठा होता. आता  १९.९२ टक्के असा अल्प जलसाठा आहे. दीड महिन्यापूर्वी  जूनच्या पहिल्या आठवड्यात या पाणीसाठय़ाची जी स्थिती हो ती, त्यात नगण्य वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उ पयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत ३७.६८ टक्के  जलसाठा आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी  जलसाठय़ाच्या तुलनेत १0.७४ टक्के जलसाठा आहे.तर   खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त ९0.४0 दलघमी  जलसाठय़ाच्या  २२.९९  टक्के जलसाठा आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील तिन्ही  मोठय़ा प्रकल्पात एकूण २३.८0 टक्के जलसाठा आहे. यावरून  पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात अल्प  जलसाठा असल्याचे दिसून येते.     

पलढग प्रकल्प व येळगाव धरण ओव्हरफ्लोपरतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे कोरड्या पडत  चाललेल्या जलसाठय़ांमध्ये वाढ होऊ लागली. २७ सप्टेंबरपयर्ंत  सरासरीच्या ९२.७३ टक्के अर्थात ६६0.0८ मिमी पाऊस  झाल्यानंतरही जिल्ह्यातील जलसाठय़ांमध्ये असलेला साठा चिं ताजनकच आहे. जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी  असे तीन मोठे प्रकल्प असून पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी,  मन, तोरणा, उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी  पलढग ओव्हरफ्लो झाले आहे. तर बुलडाणा तालुक्यातील  येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र इतर प्रकल्पांमध्ये  जलसाठा अजूनही दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे. 

मध्यम प्रकल्पात ४१.८९ टक्के जलसाठाजिल्ह्यातील एकूण ७ मध्यम प्रकल्पात ४१.८९ टक्के जलसाठा  आहे. त्यात पलढग प्रकल्प १00 टक्के भरला असून ज्ञानगंगा  प्रकल्पात ४0.५५, मस प्रकल्पात २८.७२, कोराडी प्रकल्पात  ३४.२६, मन प्रकल्पात २६.४४, तोरणा प्रकल्पात ३७.४0 व उ तावळी प्रकल्पात २४.८६ टक्के जलसाठा आहे.