Buldhana : कोवीड रुग्णालयातील २,५७६ खाटा रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:14 AM2020-10-14T11:14:50+5:302020-10-14T11:15:09+5:30

Buldhana Covid-19 जिल्ह्यात कोवीड केअर सेंटर, डेडीकेटेड हॉस्पीटल व हेल्थ सेंटर मिळून ३, २५० खाटा रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध आहे.

Buldhana: 2,576 beds vacant at Covid Hospital | Buldhana : कोवीड रुग्णालयातील २,५७६ खाटा रिकाम्या

Buldhana : कोवीड रुग्णालयातील २,५७६ खाटा रिकाम्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सद्या जिल्ह्यात कोवीड केअर सेंटर, हेल्थ सेंटर आणि डेडीक हॉस्पीटलमध्ये उपलब्ध असलेल्या ३, २५० खाटांपैकी २,५७६ खाटा रिकाम्या असल्याचे चित्र आहे. कोराना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यावर पोहोचले असल्याचा प्रथमदर्शनी हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, असे असले तरी येत्या काळात कोरोनाच्या चाचण्या वाढल्यानंतर रुग्णायात बाधीतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे त्यासंदर्भाने विचार करता १३ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात पाच कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे कोरोना बाधीत व्यक्ती मृत्यू पावण्याचे प्रमाण हे १.३७ टक्क्यावर पोहोचले आहे. जिल्हयात आतापर्यंत १११ कोरोना बाधीत व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. प्रामुख्याने यातील बहुतांश मृत्यू हे एकट्या सप्टेंबर महिन्यात झाले असून त्याची संख्या जवळपास ५६ च्या आसपास जाते. मात्र सध्या कोरोना बाधीत रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही कोरोनामुळे मृत्यू होणाºयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्याही वाढण्याची भिती आहे.
जिल्ह्यात कोवीड केअर सेंटर, डेडीकेटेड हॉस्पीटल व हेल्थ सेंटर मिळून ३, २५० खाटा रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध आहे. संभाव्य रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या सुविधेमध्ये तथा खाट्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीनेही जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र तुर्तास तरी कोरोनासंर्भाने उपाययोजना करताना उपलब्ध करण्यात आलेल्या खाटांपैकी ७९ टक्के खाटा या रिकाम्या असल्याचे एकंदरीत चित्र आहे. सध्या रुग्णालयात ४१२ बाधीतांवर उपचार करण्यात येत आहेत.

Web Title: Buldhana: 2,576 beds vacant at Covid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.