शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

बुलडाणा: सुधारीत पैसेवारी ६९ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:36 IST

डिसेंबरमध्ये जाहीर होणाऱ्या अंतिम पैसेवारी नेमकी किती येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा प्रशासनाने ३१ आॅक्टोबर रोजी सुधारीत पैसेवारी जाहीर केली असून जिल्ह्याची सुधारीत पैसेवारीही ६९ पैसे आली आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहता पैसेवारी किमान ५० पैशांच्या आत येईल, असा कयास व्यक्त केला जात होतो. मात्र प्रत्यक्षात सुधारीत पैसेवारी ही ६९ पैसे आली आहे. त्यामुळे आता डिसेंबरमध्ये जाहीर होणाऱ्या अंतिम पैसेवारी नेमकी किती येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा नजर अंदाज जाहीर करण्यात आला होता. त्यात जिल्ह्याची नजर पैसेवारी ही ७२ पैसे आली होती. त्यामुळे सुधारीत पैसेवारीही त्याच्या आसपास राहील असा अंदाज होता. मात्र २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर सुरू केल्याने शेतकºयांच्या हाताशी आलेल्या पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार ७० टक्के खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले असून साडेसात लाख हेक्टरपैकी पाच लाख १९ हजार १९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकरी प्रभावीत झालेले आहेत. परिणामी सुधारीत पैसेवारीत त्याचा प्रभाव दिसने अभिप्रेत होते. मात्र प्रत्यक्षात सुधारीत पैसेवारी ही ६९ पैसे आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरनही जिल्ह्यात राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दुसरीकडे जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात हलक्या, मध्यम व भारीच्या जमीनीमध्ये प्रत्येकी तीन या प्रमाणे सुधारीत पैसेवारी काढण्यासाठी तब्बल नऊ हजार पीक कापणी प्रयोग करण्यात आल्यानंतर ही सुधारीत पैसेवारी आली असल्याचे स्पष्ट होत आहे. आता प्रत्यक्षात अंतिम पैसेवारी डिसेंबर महिन्यात जाहीर होणार आहे. त्याकडे सध्या लक्ष लागून आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती