शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बुलडाणा: रखडलेले दोन लघू प्रकल्प मार्गी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 18:01 IST

बुलडाणा: जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीकोणातून लघू पाटबंधारे विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या आठ प्रकल्पांपैकी दुर्गबोरी आणि दिग्रस बुद्रूक कोल्हपूरी बंधारा पूर्णत्वास गेला आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा: जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीकोणातून लघू पाटबंधारे विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या आठ प्रकल्पांपैकी दुर्गबोरी आणि दिग्रस बुद्रूक कोल्हपूरी बंधारा पूर्णत्वास गेला आहे. दरम्यान, दिग्रस बुद्रूक कोल्हापूर बंधारा हा तब्बल २२ वर्षापासून रखडला होता. मात्र आता तो पूर्णत्वास गेला आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता दिग्रस बुद्रूक येथील कोल्हापूरी बंधार्यात पाणी साठविता आले नाही. मात्र पुढील पावसाळ््यात या प्रकल्पामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील जवळपास ६०६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी वेगळे असे भूसंपादन करण्याची गरज पडली नाही. सुमारे दोन दलघमी पाणीसाठवण क्षमता असलेला हा कोल्हापूरी १९९५ पासून रखडलेला होता. एप्रिल २०१७ मध्ये तो लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित आला. एक जानेवारी २०१८ ला या प्रकल्पाचे काम सुरू होऊन त्यावर सव्वा पाच कोटी रुपये खर्च आतापर्यंत झाला आहे. अवर्षणाच्या स्थितीमुळे यावर्षी त्यात पाणीसाठवता आले नाही. अन्यथा १५ आॅक्टोबर नंतर त्यात पाणी साठवले गेले असते. खडकपूर्णा नदीवर हा कोल्हापूरी बंधारा आहे. मात्र यंदा खडकपूर्णा प्रकल्पच मृतसाठ्यात असल्याने या कोल्हापूरी बंधार्यात पाणी साठवता आले नाही. दुसरीकडे ६.६० कोटी रुपयांचा दुर्गबोरी प्रकल्पही यावर्षी पूर्णत्वास गेला असून २.६७ दलघमी पाणीसाठवण क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळे ४४६ हेक्टरचे सिंचन होणार आहे. डिसेंबर २०१४ मध्ये या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. या व्यतिरिक्त आणखी सहा प्रकल्पांची कामे सध्या अंतिम टप्प्यात आली आहेत.

चौंढी प्रकल्पाला ७५ कोटी रुपयांची गरज

घाटाखालील खारपापणपट्यात येत असलेल्या चौंढी प्रकल्पाचेही काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास जून २०१९ अखेर हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर सध्या प्रयत्न होत आहेत. प्रकल्पासाठीचे ५७ टक्के भूसंपादन आतापर्यंत झाले आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी प्रकल्पही जून २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे लघु पाटबंधारे प्रकल्प विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

बोरखेडीसाठी सरळ खरेदीने घेतील २३ एक्कर जमीन

लोणार तालुक्यातील बोरखेडी प्रकल्पासंदर्भातील पूनर्वसनाची कामे ही न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे अडचणीत आली होती. त्यासंदर्भात लघू पाटबंधारे विभागाने हालचाली करून या प्रकल्पासाठी सरळ खरेदीने २३ एक्कर जमीन घेतली. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भातील काही अडचणीही आता दूर झाल्या आहेत. जवळपास २००९ पासून या प्रकल्पाची काही कामे ही न्यायप्रविष्ठ प्रकरणांमुळे रखडलेली होती. ता प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील कामेही मार्गी लागली आहेत.

रखडलेले दोन प्रकल्प आता पूर्णत्वास गेले असून निधीची उपलब्धता झाल्यास चौंढी प्रकल्पही जून २०१९ अखेर पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयास आहे. पूर्ण झालेल्या दोन प्रकल्पांमुळे जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल.

- एस. व्ही. चौधरी, कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण