शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी स्वाभिमानी आक्रमक, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:59 IST

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारातील शेती असलेले शेतकरे पीक विमा व खरीपाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देआठ दिवसात अनुदान जमा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारातील शेती असलेले शेतकरे पीक विमा व खरीपाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. शेतकºयांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. येत्या आठ दिवसात रक्कम जमा न झाल्यास तहसिल कार्यालयात बैठे सत्याग्रह करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.  मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारात शेती असलेल्या जवळपास २०० शेतकºयांच्या खात्यात अद्यापही २०१४-१५ च्या गारपीटीची नुकसान भरपाई, २०१५-१६ च्या पीक विम्याचे अनुदान आणि २०१६-१७ च्या खरीपाचे अनुदान जमा झाले नाही. ही बाब येथील शेतकºयांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांना सांगितलली. देशमुख यांनी सर्व शेतकºयांना एकत्र करुन मोताळ्याचे तहसिलदार यांची भेट घेवून निवेदन सादर केले. दरम्यान, सदर लाभार्थी शेतकºयांच्या याद्या पटवारी यांनी तहसिलकडे पाठविल्या; मात्र आपल्या स्तरावरून सदर कामास विलंब होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. येत्या आठ दिवसात सर्व शेतकºयांच्या अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पवन देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सय्यद वसीम, प्रदिप शेळके, महेंद्र जाधव, गोपाल खोंदले व टाकरखेड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना