शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

बुलडाणा : बांधकामावरील रेतीसाठय़ाची महसूल विभाग करणार पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:05 AM

बुलडाणा : रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा बसावा, यासाठी प्रशासन सरसावले  असून, रेती तस्तकरांना रोखण्यासाठी मोठी मोहीम यंत्रणेने उघडली आहे.  त्यानुषंगाने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरील रेतीसाठय़ाची महसूल यंत्रणा पाहणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बांधकामासाठी रेती खरेदी केली असल्यास रेती वाहतुकीच्या पावत्या आपल्याकडे सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. 

ठळक मुद्देरेती खरेदी करणार्‍या नागरिकांनी रेती वाहतुकीच्या पासेस घ्याव्यात!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा बसावा, यासाठी प्रशासन सरसावले  असून, रेती तस्तकरांना रोखण्यासाठी मोठी मोहीम यंत्रणेने उघडली आहे.  त्यानुषंगाने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरील रेतीसाठय़ाची महसूल यंत्रणा पाहणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बांधकामासाठी रेती खरेदी केली असल्यास रेती वाहतुकीच्या पावत्या आपल्याकडे सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. यापुढे बांधकामाकरिता किंवा इतर कामाकरिता रेतीची आवश्यकता असल्यास रेतीची खरेदी करताना संबंधित वाहनधारकांकडे परिमाणानुसार (ब्रासनुसार) नागरिकांनी वाहतूक पासेसची मागणी करावी, अशा वाहतूक पासेसची प्रत स्वत:जवळ जपून ठेवणे आता नागरिकांना क्रमप्राप्त ठरणार आहे. नागरिकांनी आपल्या बांधकाम स्थळावर रेतीची साठवणूक केली असल्यास त्या रेतीची अथवा वाळूची तपासणी  करण्याकरिता महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी जाणार आहेत. अशी तपासणी होत असताना सदर महसूल यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांना संबंधित रेती खरेदीदार नागरिकाने  केलेल्या रेतीसाठय़ानुसार वाहतूक पासेस तपासणीकरिता उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. बांधकामस्थळी साठवूण केलेल्या रेतीचा अथवा वाळूचा साठा वैध नसल्याचे आढळून आल्यास संबंधित रेती खरेदीदारावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील ७३ रेती घाटांचा लिलाव बुलडाणा जिल्ह्यातील ७३ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. या रेती घाटातून निर्गतीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाहतूक पासेस संबंधित रेती घाटधारकाला देण्यात आल्या आहेत. त्यावर लिलावधारकाचे, परवानाधारकाचे नाव आणि पत्ता, कार्यालयाचा आदेश क्रमांक किती ब्रास रेती आहे, याची सविस्तर माहितीची नोंद आहे. 

वाहनाच्या क्षमतेनुसारच वाहतूकवाहनाच्या क्षमतेनुसारच रेतीची त्यातून वाहतूक व्हावी, यासाठी रेतीची वाहतूक करणार्‍या वाहनांवर वहन क्षमतेप्रमाणे आतील व बाहेरील बाजूस पेंटने परिमाणाची (ब्रासची) निशाणी करण्यात आली आहे. रेतीची वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी त्याप्रमाणेच वाहतूक करावी. संबंधित निशाणी ट्रॉलीच्या चारही बाजूने रेष मारल्याच्या रूपामध्ये असते. त्यानुषंगाने रेतीची खरेदी करताना वाहतूक पासेसची मागणी नागरिकांनी करावी व ती जवळ बाळगावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा