शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: ‘सारी’ सदृश आजाराच्या पाच रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 10:53 IST

सुदैवाने दोन दिवसापूर्वी सारीच्या आजाराच्या रुग्णांचे पाठविण्यात आलेले पाच स्वॅब नमुनेही निगेटीव्ह आले आहेत.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या साथीचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा एकीककडे प्रयत्न करत असतानाच जिल्ह्यात सारी सदृश्य आजाराचेही रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. सुदैवाने दोन दिवसापूर्वी सारीच्या आजाराच्या रुग्णांचे पाठविण्यात आलेले पाच स्वॅब नमुनेही निगेटीव्ह आले आहेत.बुलडाणा जिल्ह्यात २८ एप्रिल रोजी कोरोना संसर्गाने एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास प्रारंभ झाला होता. याच दरम्यान दोन एप्रिल रोजी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, दहा एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यातील कोलोरी येथील एका ६३ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला होता. तिचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. ते निगेटीव्ह आले होते. मात्र या महिलेला सारी अर्थात सिव्हीअर अ‍ॅक्युट रेस्परेटरी इन्फेक्शन झाले होते, असे नंतर समोर आले होते. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात अधिक गंभीरतने सारी आजाराच्या रुग्णांची शोध मोहिम हाती घेण्यात आली होती. दररोज जिल्हा प्रशासनाकडे किमान दोन व्यक्ती सारी सदृश्य आजाराने ग्रस्त असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. २३ एप्रिल रोजीही तीन व्यक्ती सारी सदृश्य आजाराने ग्रस्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, सारीच्या रुग्णांचे स्वॅब नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. अशाच नमुन्यांपैकी पाच जणांचे कोरोना संसर्गाबाबतचे नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आयसीएमआर, डब्लयूएचओच्या गाईडलाईनआयसीएमआर आणि डब्ल्यूएचओनेही सारी आजारासंदर्भात गाईडलाईन अर्थात मार्गदर्शक सुचना दिलेल्या असून सारीच्या रुग्णांचेही स्वॅब नमुने हे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. या रुग्णांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसली तरी त्यांना सारीची लागण झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, ताप येणे, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे सारी आजाराची असून त्याचे कोरोना संसर्गाच्या लक्षणाशी साधर्म्य आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य