शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बुलडाणा पोलीस ५०९ गुन्हेगारांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 11:38 IST

Buldhana Police News ५०९ गुन्हेगारांच्या मागावर बुलडाणा पोलीस असून, आतापर्यंत ११ गुन्हेगारांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खून, दरोडा तथा सराईत असलेल्या ५०९ गुन्हेगारांच्या मागावर बुलडाणा पोलीस असून, आतापर्यंत ११ गुन्हेगारांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.दरम्यान अद्यापही गंभीर गुन्ह्यातील २० जण फरार असून, स्थानिक गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षात घरफोडीच्या घटनांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यातील ७५ टक्के आरोपींचा अद्याप शोध घेतल्या गेलेला नाही. त्यामुळे या चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. यासोबतच संपलेल्या वर्षात  जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४५ खुनाच्या घटना घडल्या होत्या. त्यातील ४२ प्रकरणात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले असले तरी तीन प्रकरणातील आरोपींचा शोध अद्याप घेतला गेलेला नाही. कोरोना संसर्गामुळे २०२० या वर्षात जिल्ह्यात आपसी वादाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे जिल्ह्याचा क्राइम रेषोही वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतही वाढ झाली.

अवैध शस्त्रास्त्र विक्री रोखण्याचे आव्हानगेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पोलिसांनी धडक कारवाई करून आठ पिस्तूल, आठ तलवारी व १५ जिवंत काडतुस जप्त केले होते. यासोबतच एटीएसने साखरखेर्डा येथे पार्सलमधून आलेले गावठी पिस्तूल जप्त केले होते. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मूळ सूत्रधार अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.  संपूर्ण वर्षात हे प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरतजिल्ह्यातील गुन्ह्यात पोलीस दलाला ५०९ आरोपी हवे आहेत. यातील काही आरोपी हे दोन ते तीन वर्षापासून फरार आहेत. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक गठित करण्यात आले असून, गोपनिय माहितीच्या आधारावर हे पथक अशा आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी