शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
4
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
5
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
6
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
7
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
8
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
9
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
10
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
11
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
12
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
13
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
14
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
15
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
16
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
17
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
18
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
19
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
20
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

बुलडाणा : निवडणूक रिंगणात सहा टक्केच महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 13:56 IST

जिल्ह्यात सात विधानसभा मतदासंघामध्ये सध्या ७५ उमेदवार रिंगणात असून त्यात महिला उमेदवारांचा समावेश केळव सहा टक्के आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राष्ट्रमाता जिजाऊंच्या रुपाने बुलडाणा जिल्ह्याची ओळख राज्यभरात मातृतीर्थ नावाने आहे. परंतू मातृतीर्थ जिल्ह्यातीलच चार मतदारसंघात महिला राजकीय आखाड्यापासून दूरच आहेत. जिल्ह्यात सात विधानसभा मतदासंघामध्ये सध्या ७५ उमेदवार रिंगणात असून त्यात महिला उमेदवारांचा समावेश केळव सहा टक्के आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रणांगणात स्त्रीशक्तीची वानवा दिसून येत आहे.आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येतात. मात्र आजही निवडणूकीच्या आखाड्यांमध्ये महिलांची संख्या नगण्यच आहे. मतदार नोंदणी आणि प्रत्यक्ष मतदान या दोन्हीमध्ये महिला मतदार पुरूषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून वारंवार समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील लोकसभेच्या असोत किंवा विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी पुरूषांच्या तुलनेत कमीच राहिलेली आहे. मतदानपाठोपाठ प्रत्यक्ष निवडणूकीमध्ये उतरण्यातही महिलांचा सहभाग कमीच आहे. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर जिल्ह्यातीत सात विधानसभा मतदासंघात एकूण ७५ उमेदवार आहेत. त्यामध्ये केवळ पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे. सध्या मेहकर, मलकापूर, बुलडाणा व खामगाव या मतदासंघातून एकही महिला उमेदवार नाही. मेहकर विधानसभा मतदरसंघातून एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये अपक्ष म्हणून रेखा बिबे या महिलेचा समावेश होता. परंतू अर्ज छाननीमध्ये या महिला उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने मेहकर विधानसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघातून १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादीने अश्विनी आखाडे या महिला उमेदवाराला संधी दिली होती. परंतू त्यांचा शिवेसेनेसमोर टिकाव न लागल्याने राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावरही राहू शकली नाही. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये सुद्धा एकाही महिला उमेदवाराचा समावेश नव्हता.तीन मतदारसंघातील महिला उमेदवारसिंदखेड राजा मतदारसंघात सविता शिवाजी मुंडे (वंचित बहुजन आघाडी), तारामती बद्रीनाथ जायभाये (अपक्ष), जळगांव जामोद मतदारसंघात डॉ. स्वाती संदीप वाकेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), चिखली मतदारसंघात श्वेता विद्याधर महाले (भाजप) व परवीन सय्यद हारून (बसपा) ह्या पाच महिला उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. परंतू अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत ७ आॅक्टोबर असल्याने या दिवशी किती उमेदवार रिंगणात राहतात, त्यात महिला किती माघार घेतात यावरच खरे चित्र स्पष्ट होईल.इच्छुक महिला उमेदवारांच्या पदरी निराशाविधानसभा निवडणुकीमध्ये बुलडाण्यासह मेहकर मतदासंघातून भाजप, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीकडून काही महिला उमेदवार इच्छुक होत्या. परंतू त्यांना पक्षाकडून संधी मिळालीच नाही. त्यामुळे इच्छुक महिलांच्या पदरात निराशाच पडली. बुलडाणा व मेहकर विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांकडून महिलांना प्रतिनिधीत्व देण्याचा विचारच केला जात नसल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019