शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : १० टक्के शेतकऱ्यांनीच केले पीक कर्जाचे नुतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 11:31 IST

Buldana News: जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्का जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अवघा १८ टक्क्यांवर असल्याचे चित्र आहे. 

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी १० टक्केच शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण केले असून, २०१९मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीमधील पात्र शेतकऱ्यांपैकी २४ हजार शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्का जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अवघा १८ टक्क्यांवर असल्याचे चित्र आहे. परिणामी पीक कर्जासाठी पात्र १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना त्वरेने पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ५ जून रोजी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत दिले आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या अंदाजानुसार चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख शेतकरी त्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करणार असल्याचा अंदाज हुकला आहे. पीक कर्ज वाटपाचा टक्का कशा पद्धतीने वाढेल, यासाठी जिल्हा अग्रणी बँकेला आता आणखी प्रभावी नियोजन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये  १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १ हजार ३०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २६ हजार ४८६ शेतकऱ्यांना आतापर्यंत २३३ कोटी २८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.  उद्दिष्टाच्या केवळ १९ टक्के शेतकऱ्यांना ते वाटप  झाले आहे. त्यातच पीक कर्जाच्या पुनर्गठणाचे अद्याप आदेश आलेले नाहीत. त्यामुळे  ही प्रक्रियाही रखडल्यात जमा आहे.

९० हजार शेतकऱ्यांचे नूतनीकरण बाकीगेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ९५५ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ६५ टक्के म्हणजेच १ लाख शेतकरी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे नवीनीकरण करतील, असा जिल्हा बँकर्स समितीचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात १० टक्केच शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांच्या कर्जाचे नवीनीकरण केले आहे. अद्याप ९० हजार शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे नवीनीकरण बाकी आहे.

नवीन शेतकऱ्यांचेही अर्ज नाहीतजिल्ह्यात चालू खरीप हंगामात १६ हजार नवीन शेतकरीही पीक कर्जासाठी अर्ज करतील, असा अंदाज बांधला गेला होता. जिल्ह्यातील खातेफोडीच्या आधारावर साधारणत: हा अंदाज असतो. मात्र, अंदाजानुसार अशा १६ हजार शेतकऱ्यांनीही पीक कर्जासाठी अर्ज केलेला नाही.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी