शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी; सिंदखेड-राजाचे नाझेर काझी यांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:47 IST

बुलडाणा: विधान परिषदेच्या जागेसाठी नाझेर काझी यांची चर्चा आहे.

बुलडाणा: विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत जून महिन्यात संपत असून यातील एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘फिल्डींग’ लावण्यात येत असल्याची विश्वसनिय माहिती प्राप्त झाली आहे. प्रामुख्याने विदर्भात काहीशा कमकुवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्याच्या दृष्टीकोणातून बुलडाणा जिल्ह्याला एक जागा मिळावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मनिषा असल्याचे समोर येत आहे. त्यानुषंगाने सिंदखेड राजाचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.वास्तविक, साहित्य, कला, विज्ञानासह विविध क्षेत्राताली तज्ज्ञ व्यक्तींची विधान परिषदेच्या १२ जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्याचे अधिकार हे राज्यपालांना आहे. राज्यपालांचा तो स्व विवेकाधीन अधिकार आहे. त्यामुळे आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात यावर सध्या जाणकारांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून अनुषंगीक सदस्यांच्या नावाचा प्रस्तावही राज्यपालांकडे जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.मात्र बुलडाण्यात या १२ जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांची वर्णी लागावी अशा दृष्टीने प्रयत्न होत असल्याची माहिती आहे. काझी हे गेल्या सहा पंचवार्षिक पासून सिंदखेड राजा पालिकेचे सदस्य असून, दहा वर्षे सलग उपनगराध्यक्ष राहीलेले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ वर्षे जिल्हा कार्याध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष असा राजकीय प्रवासही त्यांनी केला आहे. त्यामुळे यंदा राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागेवर त्यांची वर्णी लागावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यास विदर्भातील राष्ट्रवादी कांग्रेसची ताकद वाढण्यास मदत मिळेल.काझी यांना मोठा राजकीय वारसाअ‍ॅड. नाझेर काझी यांच्या घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे आजोबा स्व. एन. झी. काझी यांना स्व. इंदिरा गाधी, स्व. यशवंतराव चव्हाण यांची पाठराखण होती. स्व. दादासाहेब कन्नमवार, स्व. वसंतदादा पाटील, स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या निकटवर्तीयामध्ये काझी कुटुंब गणल्या जायचे. सिंदखेड राजा परगण्याचेही ऐतिहासिक संदर्भही काझी कुटुंबियांशी जुळलेले आहेत. यासोबतच काझी यांचे सातत्यपूर्ण राजकीय क्षेत्रातील काम पाहता त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या रुपाने मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीला विधान परिषदेचे सदस्यत्व मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टॅग्स :buldhanaबुलडाणाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSindkhed Rajaसिंदखेड राजा