शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बुलडाणा : ‘विज्युक्टा’चे जेलभरो आंदोलन; ५0 पदाधिकार्‍यांना अटक, सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:07 IST

बुलडाणा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्‍वासित व मान्य मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी २ फेब्रुवारी रोजी राज्यभर कनिष्ठ महाविद्यालयांनी महाविद्यालय बंदचे आंदोलन केले.

ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्‍वासित व मान्य मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी २ फेब्रुवारी रोजी राज्यभर कनिष्ठ महाविद्यालयांनी महाविद्यालय बंदचे आंदोलन केले. या पृष्ठभूमिवर कनिष्ठ महाविद्यालयाच्या बंदला पाठिंबा म्हणून विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनच्यावतीने येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आज जेलभरो आंदोलन केले. यावेळी जेलभरो आंदोलनात सहभागी ५0 आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, १ नोव्हेंबर २00५ पूर्वी नियुक्त विना व अंशत: अनुदानीत शिक्षकांवरील जुन्या पेन्शनबाबत अन्याय दूर करा, त्यानंतर सेवेत आलेल्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करा, कायम विनाअनुदान तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतनात त्वरित अनुदान द्यावे, २३ ऑक्टोबर २0१७ चा वरिष्ठ व निवड श्रेणीचा अन्यायकारक शासनादेश त्वरित रद्द करावा, ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियामधील त्रुटी ताबडतोब दुरूस्त कराव्या, केंद्राप्रमाणे शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात यावा व सेवानवृत्ती वय ६0 वर्षे करून सहाव्या वेतन आयोगातील ग्रेड-पेमधील अन्याय दूर करावा, आदी मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी २ फेब्रुवारी रोजी राज्यभर महाविद्यालय बंद आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलडाणा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर विज्युक्टाच्या पदाधिकार्‍यांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी आंदोलनात सहभागी पदाधिकार्‍यांना अटक करून सुटका करण्यात आली. या आंदोलनात विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराम बावस्कर, जिल्हा सचिव प्रा.किशोर काकडे, प्रा.वासुदेव डोंगरे, प्रा.संजय काळे, प्रा. प्रताप सपकाळे, प्रा.सचिन पाटील, प्रा.गणेश भरगडे, प्रा.व्ही.एम.मिरगे, प्रा.आर.एस.देवकर आदी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक