शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

बुलडाणा : शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई केल्याने घातले कु-हाडीचे घाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:11 IST

मोताळा (बुलडाणा ): शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई करणाऱ्यास तिघांनी कुऱ्हाड व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी मूर्ती शिवारात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देबुलडाणा तालुक्यातील मुर्ती शिवारातील घटनामारहाण करणा-या तिघांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा (बुलडाणा ): शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई करणाऱ्यास तिघांनी कुऱ्हाड व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी मूर्ती शिवारात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तालुक्यातील मूर्ती येथील शिवनाथ भिका धंदरे (६५) यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, शनिवारी  दुपारी गावातीलच पद्माकर भास्कर धुरंधर, पवन हरिभाऊ धुरंधर, नंदू हरिभाऊ धुरंधर हे तिघे जण फिर्यादीच्या शेतातून नांगरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात होते. शिवनाथ धंदरे यांनी त्यांना आपल्या शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई केल्याच्या कारणावरून उपरोक्त तिघांनी संगनमत करून फिर्यादीला कुऱ्हाड व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शिवनाथ धंदरे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय विनोद शिंदे व सुरळकर  करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा