शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : कृषी पंप देयक दुरुस्तीसाठी आता स्वतंत्र शिबिरे; यंत्रणेला निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:03 IST

बुलडाणा : कृषी पंपधारकांकडे असलेल्या थकित देयके भरण्यासाठी तथा त्यांच्या दुरुस्तीसाठी आता महावितरणने फिडरनिहाय देयक दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतंर्गत तीन हजार किंवा पाच हजार रुपये भरून कृषी ग्राहक सहभागी झाला असेल, तर पहिल्या हप्त्याची मुदत संपेपर्यंत त्याचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे निर्देश महावितरणने २८ डिसेंबर रोजीच काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत.

ठळक मुद्देथकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणार!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कृषी पंपधारकांकडे असलेल्या थकित देयके भरण्यासाठी तथा त्यांच्या दुरुस्तीसाठी आता महावितरणने फिडरनिहाय देयक दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतंर्गत तीन हजार किंवा पाच हजार रुपये भरून कृषी ग्राहक सहभागी झाला असेल, तर पहिल्या हप्त्याची मुदत संपेपर्यंत त्याचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे निर्देश महावितरणने २८ डिसेंबर रोजीच काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत.सोबतच ज्या कृषी ग्राहकांनी सवलतीच्या दरानेसुद्धा रक्कम भरली नसेल, अशा थकबाकीदार कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येणार असल्याचेही संबंधित पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. कृषी ग्राहकांच्या वीज देयकाची दुरुस्ती करताना ग्राहकाचा मंजूर तसेच जोडलेला विद्युत भार, मीटरवरील वाचन, फिडरवरील वीज वापराचा निर्देशांक, वापराचे तास संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाने विचारात घेणे क्रमप्राप्त असल्याचेही महावितरणचे म्हणणे आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दीड लाख वीज ग्राहकांकडे नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर ८१८ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यातील ५७ हजार ५८६ कृषी पंपांना वीज पुरवठा घेतल्यापासून देयकच भरण्यात आले नसल्याचे जनसंपर्क विभागाचे म्हणणे होते. थकबाकी भरणार्‍या कृषी पंपांची वीज खंडित होणार नाही; परंतु ज्यांनी थकबाकी भरलीच नाही, अशांची वीज खंडित करण्यात येणार आहे. सोबतच शेती पंपांची वीज खंडित होणार नाही, अशा आशयाच्या वृत्ताचे महावितरणे खंडन केले आहे.

तर तीन दिवसांत रोहित्र बदलून मिळणार!वीज रोहित्रावरील सर्व कृषी पंपधारकांनी देयकाचा भरणा केल्यास नादुरुस्त वीज रोहित्र तीन दिवसांत बदलून देण्याबाबत महावितरणने निर्देशित केले आहे. कृषी पंपांची वीज देयके दुरुस्ती आणि वसुलीच्या कामात दिरंगाई आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही महावितरणे २८ डिसेंबर रोजीच दिले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी