शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरण; आरोपींच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:24 IST

मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची २६ डिसेंबर रोजी वाढ करण्यात आली. प्रारंभी या आरोपींना  मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ही वाढ केली.

ठळक मुद्देबेकायदा गर्भपात प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची २६ डिसेंबर रोजी वाढ करण्यात आली. प्रारंभी या आरोपींना  मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ही वाढ केली.तालुक्यातील राजूर येथे बीड जिल्ह्यातील एका विवाहितेचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला होता. त्यापूर्वी तिचे परराज्यात गर्भलिंग निदान करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैद्यकीय अहर्ता नसलेल्या ब्रिजलाल सुपडा चव्हाण (५0 रा. गुळभेली, ता. मोताळा), डॉ. सैय्यद आबिद हुसेन सैय्यद नजीर (४९, रा. बुलडाणा), गर्भपात करणारी विवाहिता व तिचा पती किशोर सुदामराव चाळक (२९, रा. किनगाव, ता. गेवराई, जि. बीड) या चार जणांना अटक केली होती. त्यांना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी मंगळवारी त्यांना मलकापूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलीस निरीक्षक अविनाश भामरे करीत आहेत. बुलडाणा जिल्हय़ात गेल्या एक महिन्यात गर्भपातासंदर्भातील तीन घटना उघडकीस आल्या आहेत.  त्यातल्या त्यात मोताळा तालुक्यात लागोपाठ दोन प्रकरणे उघडकीस आली असून, परराज्यात त्याचे धागेदोरे  असल्याने हे प्रकरण पोलीस प्रशासन व शासकीय यंत्रणेने गंभीरतेने घेतले आहे. राजूर प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून, पोलिसांना ते काय माहिती देतात, याकडे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAbortionगर्भपातCrimeगुन्हा