बुलडाणा : घरकूल योजनेचे नियोजन योग्य न झाल्यास आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:57 PM2018-01-22T13:57:17+5:302018-01-22T13:58:39+5:30

 बुलडाणा : शहरातील जुना गाव परिसरातील लाभार्थ्यांवर घरकूल वाटपात अन्याय झाला असून, बाहेरच्याच मंडळीना घरकूल मिळवून देण्यासाठी आटापिटा सुरु झाला आहे.

Buldana: If the planning of the house plan is not suitable, then the agitation |  बुलडाणा : घरकूल योजनेचे नियोजन योग्य न झाल्यास आंदोलन 

 बुलडाणा : घरकूल योजनेचे नियोजन योग्य न झाल्यास आंदोलन 

Next
ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर हा वार्ड अनुसुचित जाती-जमातीसाठी राखीव असतानाही दलित वस्ती सुधार फंडाचे लाभार्थी आजही मूलभूत समस्यांपासुन वंचित आहेत. स्व.जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमान्वये घरकुल योजनेला सुुरुवात झाली.मुळ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यापूर्वीच घरकूल यादीत नाव नसताना व झोपडपट्टीत वास्तव्य नसताना सुध्दा बाहेरची मंडळी घरकुल मिळवण्याचा आटापिटा करत आहेत.

 बुलडाणा : शहरातील जुना गाव परिसरातील लाभार्थ्यांवर घरकूल वाटपात अन्याय झाला असून, बाहेरच्याच मंडळीना घरकूल मिळवून देण्यासाठी आटापिटा सुरु झाला आहे. तरी घरकूल योजनेचे नियोजन योग्य करा अन्यथा आंदोलन करु, असा इशारा येथील आंबेडकर मधील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे १९ जानेवारी रोजी दिला आहे. 
 गेल्या ६० वषार्पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर अस्तित्वात आहे. सन १९६४ पासून हा वार्ड अनुसुचित जाती-जमातीसाठी आजपावेतो राखीव वार्ड असतानाही दलित वस्ती सुधार फंडाचे लाभार्थी आजही मूलभूत समस्यांपासुन वंचित आहेत. झोपडपट्टीमध्ये राहावयास पुरेशी जागा नाही. कुडाला कुड लागून नागरिक अतिक्रमण करतात. येण्याजाण्यासाठी रस्ते नाहीत. सांडपाणी वाहुन नेण्यासाठी नाल्या नाहीत. मयत झाल्यास माड बांधण्यासाठी पुरेशी जागा नाही. शौचालय योजनेत तर पाकगृहाजवळ दुसºयाचे शौचालय उभारणे भाग पडले. आता कुठे स्व.जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमान्वये घरकुल योजनेला सुुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यामध्ये दुमजली अठरा घरकुले तयार झाली. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधील मुळ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यापूर्वीच घरकूल यादीत नाव नसताना व झोपडपट्टीत वास्तव्य नसताना सुध्दा बाहेरची मंडळी घरकुल मिळवण्याचा आटापिटा करत आहेत. तरी नगर पालिका प्रशासनान कागदपत्रे तपासून सखोल चौकशी करुनच योग्य लाभार्थ्यांना घरकुल द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे आशिष खरात, प्रदीप बोर्डे, संजय सरदार, सुंदर सरोदे, कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, अशोक सुरोशे, विनोद गवई, विरेंद्र पडोळकर, गजानन पºहाड, संतोष निकाळजे, अशोक सुरडकर, संतोष पडोळकर, भारती सोमवंशी, पुष्पाबाई जळतकर, अंजना पवार, राहुल जाधव, छाया पडोळकर, लक्ष्मी सोळंके, राजू सरदार, शोभा जाधव,गणेश इंगळे आदींच्या सह्या आहेत. यावेळी अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Buldana: If the planning of the house plan is not suitable, then the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.