शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : अडचणीचे वृक्ष करताहेत शेतरस्ता अभियानाला मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:55 IST

बुलडाणा : बुलडाणा महसुल विभागांतर्गत महिनाभरामध्ये तालुक्यात २८ शेतरस्ते निर्माण करण्यात आले आहेत. शेतरस्त्याच्यामध्ये  आलेले झाडे तोडल्यानंतर ती झाडे विकुन मिळालेल्या पैसेही रस्त्याच्याच कामासाठी लावले जात आहेत.

ठळक मुद्देबुलडाणा महसूल विभागाने महिन्याभरात तयार केले २८ शेतरस्ते!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा महसुल विभागांतर्गत महिनाभरामध्ये तालुक्यात २८ शेतरस्ते निर्माण करण्यात आले आहेत. शेतरस्त्याच्यामध्ये  आलेले झाडे तोडल्यानंतर ती झाडे विकुन मिळालेल्या पैसेही रस्त्याच्याच कामासाठी लावले जात आहेत. त्यामुळे शेतरस्त्याच्या कामात अडचणीचे ठरणारे वृक्षच शेतरस्ता अभियानाला मदतकारक ठरत आहे.शेतीला रस्ता नसेल तर शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतक-यांवर येते. त्यामुळे बुलडाणा महसुल मंडळांतर्गत लोकसहभागातून शेतरस्ते तयार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतू शेतरस्ता तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्यास शेतकरी तयार नाहीत. काही ठिकाणच्या शेतरस्त्यावरच पेरणी होते. त्यामुळे अतिक्रमणात अडकलेले शेतरस्ते मोकळे करणे वादाचे ठरत आहे. परंतू लोकसहभागातून हे अभियाना हाती घेतल्याने शेतक-यांच्या सहभागाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जात आहे. बुलडाणा तालुक्यात तहसीलदार सुरेश बगळे व त्यांच्या पथकाने दररोज एक रस्ता पुर्ण करण्याचा धोरणच आखले आहे. त्यानुसार तालुक्यात अंमलबजावणी होत असून, दिवसाला एक रस्ता सध्या पूर्ण होत आहे. महिन्याभरात बुलडाणा तालुक्यात जवळपास २८ शेतरस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्याच्या मध्ये येणारे मोठ-मोठे वृक्ष तोडल्यानंतर त्याचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतरस्ता कामात आड येणारी वृक्ष तोडून त्याच्या विक्रीतून मिळणारा पैसा त्याच रस्त्याच्या कामासाठी लावला जात आहे. त्यामुळे शेतरस्त्याचा दर्जा सुधारण्यासही मदत होत आहे. लोकसहभागातून जमा झालेला निधी आणि वृक्षाचा निधी असा एकूण पैसा हा रस्त्याच्या कामासाठी लावला जात आहे. 

वृक्ष वाचविण्यासाठी धडपडअतीक्रमणात अडकलेले शेतरस्ते मोकळे करणे व पायवाट बनलेले शेतरस्ते मोठे करण्यासाठी सध्या जिल्हाभर शेतरस्ता मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. या शेतरस्त्यातत येणारे वृक्ष वाचिवण्यासाठी प्रशासनासह शेतकरी धडपड करत आहेत. मोठ-मोठे वृक्ष न तोडताच रस्ता तयार केला जातो; मात्र अत्यंत अडचणीचे ठरणारे वृक्ष यामध्ये तोडल्या जातात. 

माळवंडी, येळगाव येथील रस्ता झाला मोकळाबुलडाणा तालुक्यातील माळवंडी व येळगाव येथे शेतरस्त्याची मोठी अडचण होती. दरम्यान, ९ जानेवारीला माळवंडी व येळगाव या दोन्ही ठिकाणी शेतरस्ता कामाला तहसीलदार सुरेश बगळे यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या शेतरस्त्यासाठी लोकसहभागही उत्स्फुर्त वाढत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा