शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : संचारबंदीचा विसर; वर्दळ सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 14:26 IST

प्रशासन गंभीर असले तरी नागरिक बेफिकीर असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गत दोन दिवस संचारबंदीचे पालन केल्यानंतर आता २७ मार्च रोजी नागरिकांना संचारबंदीचा विसर पडला असल्याचा प्रकार समोर आला. बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्त्यांवर गर्दी दिसून आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन गंभीर असले तरी नागरिक बेफिकीर असल्याचे स्पष्ट होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे संचारबंदी लागू केली. मात्र त्याचे उल्लंघन नागरिकांकडून केले जात आहे. अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अनेक नागरिक भाजीपाला, किराणा माल खरेदीचे कारण दाखवून बाहेर पडत आहेत. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. पोलीस विभाग व नगर पालिकेचे वाहनही शहरातन फिरत आहे. या वाहनाद्वारे शहरात कोरोनाची खबरदारी व उपाययोजनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगितल्या जात आहे. मात्र नागरिकांची गर्दी थांबता थांबत नसल्याचे दिसून येते. छोटे-मोठे कारण सांगून मुले दुचाकीने रस्त्यावरून फिरताना दिसून येत आहेत.

सकाळ संध्याकाळ चहलपहेल; दुपारी सन्नाटासकाळ व संध्याकाळी नागरिकांची रस्त्याने चहलपहेल सुरू असते. त्यामुळे संचारबंदी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होते. दुपारी फक्त रस्त्याने सन्नाटा पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्याने फिरताना दिसून येतात. संचारबंदीतही काही कुटूंब रात्रीच्यावेळी रस्त्याने फिरण्याचे आपले नित्यनियम मोडत नसल्याचे बुलडाण्यात पाहावयास मिळते.

ठरवून दिलेल्या जागेवर उभे रहा!

किराणा दुकान, मेडिकल, भाजीपाला मार्केट याठिकाणी वर्तुळ आखून ग्राहकांना त्याठिकाणी उभे राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. परंतू नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते. येथील बाजारामध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मेडिकल, दूध डेअरी याठिकाणी सुद्धा आखून दिलेले वर्तुळ नावालाच राहत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस