शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : स्वाभिमानी संघटनेचा अपर जिल्हाधिकार्‍यांना घेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:20 IST

बुलडाणा: शासनाने खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन प्रकल्पाकरिता शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत; परंतु आजपर्यंत शेतकर्‍यांच्या ज्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्याचा योग्य मोबदला शेतकर्‍यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना भूसंपादन अधिनियम २0१४ मधील तरतुदीनुसार मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी १ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले. 

ठळक मुद्देभूसंपादनग्रस्त शेतकर्‍यांना भूसंपादन अधिनियमानुसार मोबदला द्या!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासनाने खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन प्रकल्पाकरिता शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत; परंतु आजपर्यंत शेतकर्‍यांच्या ज्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्याचा योग्य मोबदला शेतकर्‍यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना भूसंपादन अधिनियम २0१४ मधील तरतुदीनुसार मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी १ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले. शासनाने ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी भूसंपादन विभागामार्फत संपादित केल्या आहेत, त्या शेतकर्‍यांना सरकारने त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी चार पट मोबदला देण्याच्या अधिसूचना जाहीर केल्या होत्या. आजपर्यंत शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या आहेत; परंतु आजपर्यंत शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा भूसंपादन अधिनियम २0१४ च्या तरतुदीनुसार मोबदला मिळाला नाही. चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर, येवता व कोनड यांसह अनेक गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी खडकपूर्णा पाटात गेल्याने शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. देऊळगाव धनगर येथील शेतकरी शासनाच्या नवीन भूसंपादन अधिनियम सन २0१४ नुसार मोबदला मिळण्यास पात्र असतानासुद्धा त्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही. म्हणून शासनाने याकडे लक्ष देऊन चिखली तालुक्यातील देऊळागाव  धनगर, येवता व कोनड यासह अनेक गावातील शेतकर्‍यांना भूसंपादनाच्या नविन तरतुदीनुसार वाढीव मोबदला देण्यात यावा, अन्याथा स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, चिखली तालुकाध्यक्ष भरत वाघमारे, गजानन घुबे यांनी दिला आहे.शेतकर्‍यांना भूसंपादन अधिनियम २0१४ मधील तरतुदीनुसार मोबदला मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालून आंदोलन केले. यावेळी शेख रफिक, शेख करीम, हरिभाऊ उबरहंडे, अमोल मोरे, महेंद्र जाधव, नारायण घुबे, विष्णू घुबे, द्वारका घुबे, सुगदेव घुबे, समाधान घुबे, अनंथा घुबे, जनार्धन घुबे, गणेश घुबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना