शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ातील बनावट दिव्यांग शिक्षक ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:37 IST

बुलडाणा :  शिक्षकांची बदली प्रक्रिया व पदोन्नतीदरम्यान जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांच्या प्रमाणपत्रांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून, यातील दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देदिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी सुरू जिल्ह्यात ३७४ दिव्यांग शिक्षक

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा :  शिक्षकांची बदली प्रक्रिया व पदोन्नतीदरम्यान जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांच्या प्रमाणपत्रांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून, यातील दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात एकूण ३७४ दिव्यांग शिक्षक असून, या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या विविध सभा तसेच जिल्हा व तालुक्यांतर्गत बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. संबंधित प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षकांनी पदोन्नती, बदलीतून सूट आदी सुविधांचा लाभ घेतला आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आल्या होत्या.  याची दखल घेऊन ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना २0 डिसेंबर रोजीच्या एका आदेशान्वये दिव्यांग शिक्षकांनी  सादर केलेल्या  दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय  घेतला असून, त्यासंबंधी प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत दिव्यांग असणार्‍या व्यक्ती व त्यांच्याकडे असणार्‍या दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी होणार आहे. यासाठी तालुकानिहाय शिबिर घेऊन दिव्यांग शिक्षकांची झाडाझडती आगामी काही दिवसांत होईल. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

तालुकानिहाय चौकशी होणार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे एकूण ३७४ दिव्यांग शिक्षक असल्याची नोंद आहे. त्यात २९१ मराठी सहायक शिक्षक,  १८ उर्दू सहायक शिक्षक, ६१ मराठी मुख्याध्यापक, ५ उर्दू मुख्याध्यापक, १७ केंद्र प्रमुखांचा समावेश आहे. त्यांच्या प्रमाणपत्रांची तालुकानिहाय चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र सादर करणार्‍या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

फौजदारी कारवाईचे संकेतया दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी कार्यवाहीमुळे जे शिक्षक वर्षानुवर्षे एकाच तालुक्यात ठाण मांडून असून, शासनाच्या सुविधा घेत आहेत, त्यांच्यावर  जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत होणार्‍या चौकशीदरम्यान दोषी आढळणार्‍या शिक्षकांवर शासनाची दिशाभूल करीत सुविधांचा लाभ लाटल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक