शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:43 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांना अद्यापही गत वर्षी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या एक दशकापासून दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांना अद्यापही गत वर्षी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम जवळपास १३९ कोटींच्या घरात जाते. दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याअनुषंगाने शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ५८६ गावातील दोन लाख २७२ हजार हेक्टर क्षेत्र या पाच तालुक्यात बाधीत झाले होते. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या जवळपास ३१ टक्के पाऊस कमी पडल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यातील ५५ मंडळामधील ८३४ गावांमध्ये दुष्काळ ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला होता. नवीन निकषाच्या आधारावर हा दुष्काळ जाहीर झाला होता. मात्र जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यातील ३८ मंडळामधील ५८६ गावांचीही स्थिती बिकट होती. त्यानुषंगाने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे २७ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत उर्वरित मंडळामध्ये पडलेला पाऊस, पीक कापणी प्रयोगाचा अहवाल आणि उत्पादकतेसंदर्भातील अहवालाचा मॅन्युअली अभ्यास करून पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यासंदर्भाने सहा नोव्हेंबर २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ दरम्यान उर्वरित ३८ मंडळातील ५८६ गावात दुष्काळ जाहीर झाला होता.मात्र प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यातील मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यातील ८३४ गावातील तीन लाख २० हजार ३०८ शेतकºयांना १९५ कोटी २४ लाख ३१ हजार ३५३ रुपयांची मदत देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर झालेल्या उपरोक्त गावातील शेतकºयांना ९८ टक्के मदत वाटप करण्यात आली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यात दुष्काळ घोषित झालेल्या भागातही ८९ कोटी २२ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वाटप करणे बाकी आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने अमरावती आयुक्त कार्यालयाकडे अनुषंगीक मागणी केलेली आहे. मात्र अद्यापही रक्कम मिळालेली नाही. तहसिल कार्यालयाकडूनही त्याची मागणी होत आहे. उर्वरित पाच तालुक्यातील ५८६ गावांतील शेतकºयांनाही दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आॅगस्ट २०१९ उजाडले असतानाही मिळालेली नाही. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे २० जुलै रोजीच प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्यापही रक्कम उपलब्ध झाली नाही. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस असला तरी प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मात्र वाढ झालेली नाही.

पाच तालुक्याील शेतकºयांच्या दुष्काळी मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ८९ कोटी रुपयांचाही प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.-भिकाजी घुगेनिवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी