शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा : ४३ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक; प्रशासन सज्ज, ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवारांमध्ये लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 20:52 IST

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवार व ४०५ सदस्य पदासाठी ७६६ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सरपंच व सदस्य पदाच्या एकूण ९३९ उमेदवारांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

ठळक मुद्देप्रचारतोफा थंडावल्या९३९ उमेदवारांसाठी होणार मतदान

बुलडाणा : जिल्ह्यात ४३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून २४ डिसेंबरला प्रचार तोफा थंडावल्या. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवार व ४०५ सदस्य पदासाठी ७६६ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सरपंच व सदस्य पदाच्या एकूण ९३९ उमेदवारांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१८  या दोन महिन्यात मुदती संपणा-या ४३ ग्रामपंचायतींची दुस-या टप्प्यातील निवडणूक २६ डिसेंबर रोजी होत आहे. सरपंच पद थेट जनतेतून निवडायचे असल्याने या निवडणूका ख-या अर्थाने सरपंच पदाभोवतीच केंद्रीत झाल्या आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया ५ डिसेंबर पासून सुरू झाली होती. ग्रामपंचायतच्या ४३ सरपंच पदासाठी छाननीअंती एकूण २६९ नामनिर्देशन दाखल होते. यापैकी ९६ उमेवारांनी माघार घेतल्याने सरपंच पदासाठी एकूण १७३ उमेदवार रिंगणार आहेत. तर ४३ ग्रामपंचायतमध्ये ४०५ सदस्यपदासाठी छाननीअंती एकूण ९६४ नामनिर्देशन दाखल होते. यामध्ये १९८ उमेदवारांनी माघार घेतल्याने सदस्यपदासाठी ७६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ४३ ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्य पदासाठी ९३९ उमेदवारांकरिता मंगळवारला मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराला १५ डिसेंबरपासून सुरूवात झाली होती. दरम्यान, २४ डिसेंबरला प्रचार बंद झाला असून, प्रशासनही मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे.

मतदान क्षेत्रातील बाजारावर बंदीमतदानाच्यादिवशी मतदारांना मतदान करता यावे तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन  २६ डिसेंबर मंगळवार व २७ डिसेंबर बुधवारला मतमोजणीच्या दिवशी  ग्रामपंचायत मतदान क्षेत्रात भरणारा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी मतदान क्षेत्रात बाजार न भरविता त्यापुढील दिवशी गुरुवार २८ डिसेंबर रोजी बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हादंडाधिकाºयांनी दिली आहे.

२७ डिसेंबरला मतमोजणी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. तसेच २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी जाहीर करण्यात येणार आहे. बुलडाणा तालुक्यासाठी मतमोजणीचे ठिकाण तहसिल कार्यालय बुलडाणा, चिखली तालुक्यासाठी तालुका क्रिडा संकुल बॅड मिंटन हॉल, सिंदखेडराजा तालुक्यासाठी  नगर पालीका टाऊन हॉल, देऊळगाव राजा तालुक्यासाठी तहसिल कार्यालय, मेहकर तालुक्यासाठी तहसिल कार्यालय, लोणार तालुक्यासाठी तहसिल कार्यालय, खामगाव तालुक्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह तहसिल कार्यालय, शेगाव तालुक्यासाठी पंचायत समिती सभागृह, मलकापूर तालुक्यासाठी प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय, मोताळा तालुक्यासाठी तहसिल कार्यालय, जळगाव जामोद तालुक्यासाठी तहसिल कार्यालय येथे होणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक