शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ात शेतरस्ते घेत आहेत मोकळा श्‍वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:53 IST

बुलडाणा :  गाव नकाशावर शेतरस्ते असतानाही प्रत्यक्षात ते रस्ते अतिक्रमणात अडकल्याने शेतकर्‍यांना मोठा त्रास सोसावा लागतो. दरम्यान, बुलडाणा महसूल विभागाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पायवाट, अतिक्रमणात अडकलेल्या शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देबुलडाणा महसूल विभागाचा उपक्रम दिवसाला एक रस्ता पूर्णत्वाचे लक्ष्य

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  गाव नकाशावर शेतरस्ते असतानाही प्रत्यक्षात ते रस्ते अतिक्रमणात अडकल्याने शेतकर्‍यांना मोठा त्रास सोसावा लागतो. दरम्यान, बुलडाणा महसूल विभागाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पायवाट, अतिक्रमणात अडकलेल्या शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. लवकरच ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. दिवसाला किमान एका शेतरस्त्याचे ‘टार्गेट’ पूर्णत्वास जात असल्याने गाव नकाशावरील शेतरस्त्यांनी मोकळा श्‍वास घेण्यास सुरुवात केली आहे.पारंपरिक शेतरस्ते कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी अडचणी येत आहेत. गाव नकाशावर रस्ता असतानाही मोठमोठय़ा पांदन शेतरस्त्याच्या भोवती झालेल्या अतिक्रमणामुळे शेतात जाण्यासाठी रस्ताच उरला नाही. शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व शेतात जाण्यास सोयीचे होण्यासाठी बुलडाण्याच्या महसूल मंडळाच्यावतीने अनेक ठिकाणी पांदन शेतरस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे.  मोठय़ा पांदन रस्त्याची पायवाट निर्माण झाली असेल किंवा नकाशावर रस्ता असताना प्रत्यक्षात रस्ता नसेल अशा गावातील शेतकर्‍यांच्या बांधावर जावून त्यांना रस्ता पांधनमुक्ती करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे. गत १५ दिवसांत १५ शेतरस्ते बुलडाणा मंडळांतर्गत मोकळे करण्यात आले आहेत. त्यासाठी गावोगावी तहसीलदार सुरेश बगळे, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून शेतरस्ते निर्माण करण्याचे काम सुरू आहे. बुलडाणा महसूल विभागाने दिवसाला एका शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे टार्गेटच हाती घेतले असून, यासाठी उत्स्फूर्त लोकसहभागही मिळत आहे. बुलडाणा महसूल विभागात राबविण्यात येत असलेला उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सर्व तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतरस्ते काही दिवसात अतिक्रमणापासून मुक्त होतील. 

अतिक्रमणात अडकलेले शेतरस्ते लोकसहभागातून काढण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.  बुलडाणा तालुक्यात अनेक ठिकाणच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले असून, जिल्हाभरातील शेतरस्ते मोकळे करण्यात येणार आहेत.- डॉ.चंद्रकांत पुलकूंडवार,जिल्हाधिकारी.- 

टॅग्स :buldhanaबुलडाणा