शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

बुलडाणा जिल्ह्यात १५ हजार शेतकऱ्यांचा मका घरात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:11 IST

अडचणीच्या काळात जिल्ह्यातील १५ हजार शेतकºयांचा मका आता घरात पडून आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मका खरेदीसाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली होती. परंतू राज्य शासनाचे मका खरेदीचे ‘टार्गेट’ पूर्ण झाल्याने जिल्ह्यात मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदरच खरेदी बंद करण्यात आली. हमीभावाने मका खरेदीसाठी नोंदणी केलेल्या ८२ टक्के शेतकऱ्यांचा मका खरेदी झालेला नाही. त्यामुळे अडचणीच्या काळात जिल्ह्यातील १५ हजार शेतकºयांचा मका आता घरात पडून आहे.जिल्ह्यात सुरूवातीपासूनच मका खरेदी वांध्यात आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊनमुळे मिल्स बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेती विषयक बरदाण्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. बरदाण्या अभावी मका खरेदीला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी हमीभावाने मका खरेदीला यंदा विलंब लागला. जूनमध्ये राज्य शासनाने मका खरेदी सुरू केली. त्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यात १३ केंद्रावर मका खरेदी सुरू होती. परंतू नोंदणीसाठी अनेकांना अडचणी आल्या. नोंदणीनंतर मका खरेदी संथगतीने होत असल्याने केंद्रावर शेतकºयांची गर्दी वाढत होती. बाजार समितीसमोर मका घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकºयांनी मका खरेदीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ १८ टक्के म्हणजे ३ हजार २८० शेतकºयांचीच मका खरेदी पूर्ण झालेली आहे. सध्या नोंदणी केलेल्यांपैकी १५ हजार ३९३ शेतकºयांचा मका खरेदी झालेली नाही.राज्य शासनाने ठरवून दिलेले मका खरेदीचा लक्षांक लवकरच पूर्ण झाल्याकारणारे प्रशासनाने मुदत संपण्याची वाट न बघता ३० जुलै रोजीच मका खरेदीची प्रक्रिया बंद केली. राज्य शासनाच्या मका खरेदी लक्षांकाचा जिल्ह्यातील शेतकºयांना मोठा फटका बसला आहे. नोंदणी केलेल्या ८२ टक्के शेतकºयांना पुन्हा मका खरेदी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

१.८२ लाख क्विंटल मका खरेदीजिल्ह्यातील ३ हजार २८२ शेतकºयांचा १ लाख ८२ हजार ३२७ क्विंटल मका खरेदी ३० जुलैपर्यंत करण्यात आली आहे. मका खरेदीसंदर्भात नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी ४ हजार १३५ शेतकºयांना एसएमएस पाठविण्यात आले होते. तर १४ हजार ७४१ शेतकºयांना एसएमएस पाठविणे बाकी आहे.खरेदीवरून रणकंदनजिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी निम्म्या शेतकºयांचाही मका शासन खरेदी करू शकले नाही. त्यामुळे मका खरेदीच्या कारणावरून सध्या जिल्ह्यात रणकंदन बघावायास मिळत आहे. लोकप्रतिनिधींसह शेतकरी आक्रमक भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाºयांच्या दालनात मका टाकण्याचा गंभीर इशाºयाने प्रशासनही हादरले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी