शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

बुलडाणा जिल्ह्यात हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:36 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील हेमाडपंती मंदिरांचे वैभव सध्या धोक्यात सापडले आहे. अनेक ठिकाणच्या मंदिरांची पडझड झाली असून, काही ठिकाणी जुन्या मूर्तींचे अवशेषही गायब झाल्याचे दिसून येते.

- ब्रह्मानंद जाधवबुलडाणा: जिल्ह्यातील हेमाडपंती मंदिरांचे वैभव सध्या धोक्यात सापडले आहे. अनेक ठिकाणच्या मंदिरांची पडझड झाली असून, काही ठिकाणी जुन्या मूर्तींचे अवशेषही गायब झाल्याचे दिसून येते. लोणार सरोवर काठावरील आठ हेमाडपंती मंदिरांच्या कामांना मान्यता मिळाली असून, एका मंदिराला ३५ ते ४० लाख रुपयांपर्यंत निधी मंजूर झाला आहे; परंतु या मंदिरांची कामे अडली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सोमवारी असलेल्या महाशिवरात्री उत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील हेमाडपंती शिव मंदिरांची माहिती घेतली असता हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षाच समोर आली. जिल्ह्याला मध्ययुगीन व हेमाडपंती मंदिररूपी धार्मिक असा मौल्यवान वारसा लाभलेला आहे. जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराच्या बाह्य कडेवर २६ हेमाडपंती शिव मंदिरे मोठ्या दिमाखात उभी आहेत. सरोवर परिसरातही अनेक प्राचीन मंदिरे आहेत. सरोवर काठावरील शंकर गणेश मंदिर, रामगया मंदिर, अंबरखाना मंदिर, शुक्राचार्य वेध शाळा, यज्ञवल्केश्वर, सीता न्हाणी, कुमारेश्वर, पापहरेश्वर, हटकेश्वर, बह्मकुंड, यमतीर्थ, सोमतीर्थ, वायूतीर्थ यासह अनेक पौराणिक शिव मंदिर शिल्पकलेची साक्ष देत आहेत; परंतु सध्या या मंदिरांची अत्यंत दुरवस्था झाल्याचे दिसून येते. पुरातन विभागाकडून या मंदिराची केव्हाच स्वच्छता किंवा डागडुजी केल्या जात नसल्याने हेमाडपंती मंदिररूपी ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सरोवर काठावरील दुर्लक्षित शिव मंदिरामध्ये दिवसा काळा कुट्ट अंधार राहत असून, तेथे साप, वटवाघळासह विविध दुर्मीळ कीटकही आढळून येतात. त्यामुळे अनेक भाविक सरोवर काठावरील शिव मंदिरात जाण्याचे टाळत आहेत. यातील आठ मंदिराच्या कामांना मान्यता मिळालेली आहे; परंतु अद्यापही अंमलबजावणीला सुरुवात झाली नाही. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत लोणारसाठी १० कोटी ९८ लाखांचा निधी मागील वर्षी मिळाला. यातून ७ कोटी १२ लाखांचा निधी खर्च करण्यात आला असून, ६ कोटी ६० लाखांचा निधी प्रत्यक्ष सांडपाणी व्यवस्थापनासह, निरीक्षण मनोरे उभारणीसाठी खर्च झाला आहे. लोणारबरोबरच इतर ठिकाणच्या मंदिरांची अवस्था दयनीय आहे.नीळकंठेश्वर मंदिराच्या कामावर कोट्यवधींचा खर्चसिंदखेड राजा येथील नीळकंठेश्वर मंदिराच्या दगडी फरशीच्या कामाला सध्या वेग आला आहे. या मंदिराच्या कामावर १ कोटी २७ लाख ८८ हजार ८३८ रुपये खर्च अपेक्षित आहे. ३११ कोटींच्या सिंदखेड राजा विकास आराखड्यांतर्गत ही कामे सुरू आहेत. मागील वर्षी पुरातत्व खात्यातंर्गत २५ कोटी रुपायांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. यापैकी १२ कोटी ९६ लाख ४९ हजार १७५ रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. त्यातंर्गत सध्याहेमाडपंती स्थापत्यशैलीभारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ या काळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या ईमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणी पद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली. मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे. सामान्यत: इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्या प्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणारTempleमंदिर