शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 11:57 IST

Buldana District Hospital नुतनीकरणाचे प्रमाणपत्रच घेण्यात आले नसल्याचे शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या  ‘रिॲलिटी चेक’  मध्ये समोर आले आहे.

ठळक मुद्दे गेल्या पाच वर्षात यासंदर्भात एकदाही प्रयत्न करण्यात आलेला नाही.पालिकेच्या अग्नीशमन दलाकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नीशमन यंत्रणेचे सर्वेक्षण करून तसे नुतनीकरणाचे प्रमाणपत्रच घेण्यात आले नसल्याचे शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या  ‘रिॲलिटी चेक’  मध्ये समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात यासंदर्भात एकदाही प्रयत्न करण्यात आलेला नाही.भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये ९ जानेवारी रोजी पहाटे आग लागून  १० नवजात बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयासह खामगाव, मलकापूर, शेगाव येथील उपजिल्हा  रुग्णालयात हा ‘रिॲलिटी चेक’ करण्यात आला. त्यावेळी ही बाब समोर आली.बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नीशमन यंत्रे सुस्थितीत असली, तरी दर ११ महिन्यांनी या यंत्रांची व आगीच्या संदर्भाने रुग्णालय सुरक्षीत आहे, की नाही यासंदर्भात सर्वेक्षण करून पालिकेच्या अग्नीशमन दलाकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते; मात्र बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गत पाच वर्षात असे सर्वेक्षणच करण्यात आलेले नाही. तशी मागणीही पालिकेच्या अग्नीशमन दलाकडे करण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या सर्वेक्षणासाठी जवळपास दहा हजार रुपये खर्च अपेक्षीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  दुसरीकडे, १०० खाटांच्या स्त्री रुग्णालय व वर्तमान स्थितीत समर्पीत कोवीड रुग्णालयातील अग्नीश्यामक यंत्रणेचे तपासणी व सर्वेक्षणासाठी ३१ डिसेंबर २०२० रोजी पालिका प्रशासनास पत्र देण्यात आले आहे. येथील सर्वेक्षण सोमवारी केले जाणार असल्याचे पालिकेचे उपमुख्याधिकारी एस. के. लघाने यांनी सांगितले.

अतिदक्षता विभागात अग्निशमन यंत्राचा अभाव!जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अग्निशमन यंत्रच लावण्यात आलेले नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले. भांडारगृह, नवजात शिशू केअर युनीट आणि कॅज्युल्टी विभागात अशी अग्नीशमन यंत्र लावण्यात आलेले व सुस्थितीत असल्याचे पाहणीत समोर आले. इलेक्ट्रीकल अग्नीरोधक म्हणून काम करणाऱ्या सीअेाटू प्रकारच्या अग्नीशमन यंत्राचे प्रेशरही योग्य असल्याचे पाहणीत समोर आले; मात्र काही यंत्रांना आवश्यक असलेले नोझल नसल्याचे दिसून आले.

एक महिन्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्जरीची खोली व अन्य ठिकाणची वायरिंग सुस्थितीत करून नवीन स्वीच बसविण्यात आलेले आहेत. तसेच नवजात शिशू केअर विभागातील परिचारिका, डॉक्टर यांना सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण व सूचना पूर्वीच दिलेल्या आहेत.- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावMalkapurमलकापूरShegaonशेगाव