शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

बुलडाणा जिल्ह्यातील बाष्पीभवन मापक यंत्राचे भिजत घोंगडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 17:48 IST

बुलडाणा: नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात येणार होते. गेल्या दीड वर्षापासून याची अंमलबजावणी प्रस्तावीत आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात येणार होते. गेल्या दीड वर्षापासून याची अंमलबजावणी प्रस्तावीत आहे. जिल्ह्यात बाष्पीभवन यंत्राचे भिजत घोंगडे असल्याने प्रकल्पांमध्ये होणाºया बाष्पीभवनाची अद्ययावत नोंद न होता अंदाजावर मापन होत असल्याचे चित्र आहे.  उष्णतेमुळे पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. वाढत्या उष्णतेमुळे जलसाठ्यातील बाष्पीभवनाचा वेगही झपाट्याने वाढत आहे. हवामानातील या बदलामुळे जिल्ह्यातील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अमर्याद बाष्पीभवनाचा फटका बसत आहे.   दरवर्षी होणाºया बाष्पीभवनामुळे प्रचंड पाणीसाठा नाहीसा होत असून, या नैसर्गिक आपत्तीवर अद्याप तरी तोडगा काढता आलेला नाही. बाष्पीकरण हे द्रव टप्प्यापासून वाफेपर्यंतचे एक चरण संक्रमण आहे जे उष्मांक तापमानाच्या जवळ दिलेल्या दबावाने तापमानात येते. बाष्पीभवन केवळ तेव्हाच होते जेव्हा एखाद्या पदार्थाच्या वाफेचे आंशिक दाब संतुलित संतुलनास वाफ दाबापेक्षा कमी असते. जलाशयात होणाºया बाष्पीभवनाची अद्ययावत नोंद घेता यावी, यासाठी पश्चिम महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून बाष्पीभवन मापक यंत्र बसवण्यात आलेले आहेत. त्याचधर्तीवर हवामानातील बदल, वाढते उष्णतामान पाहता एक हजार हेक्टर पेक्षा अधिक सिंचन क्षमता असणाºया बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू अध्या एकूण १६ प्रकल्पावर नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मार्गदर्शक तत्वानुसार बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात येणार होते. परंतू १०१७ पासून अद्यापपर्यंत ही यंत्रे बसविण्यात आली नाहीत. बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी नळगंगा, मध्यम प्रकल्पांपैकी ज्ञानगंगा, कोराडी, पलढग, मस, मन, तोरणा, उतावळी आणि लघू प्रकल्पांपैकी मांडवा, व्याघ्रा नाला, बोरखेडी, ढोरपगाव, मासरूळ, विद्रूपा, करडी, ब्राम्हणवाडा या प्रकल्पांवर हे यंत्र बसविण्यात येणार होते.  नळगंगा प्रकल्पासह खडकपूर्णा आणि पेनटाकळी प्रकल्पावर ही यंत्रे पूर्वी बसविण्यात आलेली होती. मात्र नळगंगा प्रकल्पावरील एक यंत्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे त्याचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक येथील मेरी संस्थेने ही यंत्रे बनवली असून प्रती यंत्र ८० हजार रुपये खर्च त्यास असून १२ लाख ८० हजार रुपये किंमतीची ही यंत्रणे आहेत.

पाणी आरक्षीत करण्यास अडचणीसाधारणत: वार्षिक सरासरी ३० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत असते. त्यामुळे शहरी तथा नागरी भागासाठी पिण्याचे पाणी तथा शेती सिंचनाचे पाणी आरक्षीत करताना बाष्पीभवनाचा अंदाज घेऊन करण्यात येते. हे अंदाज चुकूही शकतात, त्यामुळे पाणी आरक्षीत करण्यासत अडचणी निर्माण होतात. साधारणत: राज्यातील मोठ्या व मध्यम स्वरुपाच्या प्रकल्पांवर प्रकल्प निर्मिती दरम्यानच हे बाष्पीभवन मापक यंत्र लावण्यात येतात. 

 आज जागतीक हवामान दिनहवामान बदलांसंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी २३ मार्च हा जागतिक हवामान दिन साजरा करतात. सर्वांना हवामानाचे महत्त्व समजावे यासाठी प्रयत्न होत असनाही प्रशासकीय पातळीवरच हवामानाविषयी अनास्था असल्याचे दिसून येते. गेल्या दीड वर्षापासून बाष्पीभवन यंत्र बसविण्याकडे प्रशासकीय पातळीवरून हालचाली न झाल्याने प्रशासनाची जागरूकता यामुळे समोर आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा