शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘ई-ग्रंथालय’ यू-ट्युबवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:30 IST

बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. 

ठळक मुद्देआता स्पर्धा परीक्षार्थींना एका क्लिकवर मिळणार अद्ययावत माहिती

सोहम घाडगे । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळाव्या, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वर्षांपूर्वी ई-ग्रंथालय सुरू करण्यात आले. या ग्रंथालयात अद्ययावत अभ्यासिका, इंटरनेट, पुस्तके उपलब्ध आहेत. दरवर्षी ५0 विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. यासाठी चाचणी परीक्षा घेतली जाते. यंदा जिल्ह्यातील ३५0 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्याद्वारे ५८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात जास्तीत जास्त माहिती लगेच उपलब्ध व्हावी, यासाठी ई-ग्रंथालयाचे यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. ग्रंथालयाद्वारे राबविल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती भविष्यात या चॅनेलवर अपलोड करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या लिंक, अभ्यासक्रम टाकण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्‍हाडे यांनी दिली. ई-गं्रथालयाच्या लोगोचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सदर उपक्रम राबविण्यात आला असून, यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे. 

दर महिन्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शनई-ग्रंथालयातर्फे दर महिन्याला विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. याकरिता सर्वांंसाठी प्रवेश खुला असणार आहे. दरम्यान, गुरुवारी भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक सुजीत जाधोर यांचे व्याख्यान झाले. यावर्षीचे हे पहिलेच व्याख्यान होते.

ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत चांगल्या सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यू-ट्युबवर सबस्क्राइब केल्यामुळे भविष्यात माहितीचा ओघ अधिक वेगवान होईल. - ललितकुमार वर्‍हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाYouTubeयु ट्यूबcollectorतहसीलदारlibraryवाचनालय