बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी ई-ग्रंथालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:23 AM2017-11-25T01:23:35+5:302017-11-25T01:26:16+5:30

स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील  अभ्यासिका कक्षेत ई-ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एम पीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ई- ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे

E-library for students to conduct competitive examination | बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी ई-ग्रंथालय!

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी ई-ग्रंथालय!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हास्तरीय सेतू समितीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील  अभ्यासिका कक्षेत ई-ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एम पीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ई- ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. 
जिल्हास्तरीय सेतू समिती अंतर्गत एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा  अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना नि:शुल्क  प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहे त. अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जासोबत पदवीचे प्रमाणपत्र जोडून  अर्ज ई- ग्रंथालय, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे  सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर अर्ज व पदवीचे  प्रमाणपत्र २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजेपासून  ते ८ डिसेंबर रोजी  सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच  आवश्यकता असल्यास परीक्षेस पात्र ठरलेल्या उमदेवारांची लेखी परीक्षेची   यादी व प्रवेशपत्र सदर संकेतस्थळावर १५ डिसेंबर रोजी अपलोड करण्यात  यणार आहे.

Web Title: E-library for students to conduct competitive examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.