शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ात कपाशीनंतर आता तुरीवर किडींचा हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:37 IST

बुलडाणा : कपाशीवरील बोंडअळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना आता तुरीवर पडत असलेल्या किडींमुळे पुन्हा दुसरा धक्का बसत आहे. जिल्ह्यात तुरीवर आता शेंगा पोखरणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तूर उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. गतवर्षी तुरीचे जादा उत्पादन तर यावर्षी शेंगा पोखरणार्‍या अळीमुळे उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशेंगा पोखरणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव तूर उत्पादक शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कपाशीवरील बोंडअळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना आता तुरीवर पडत असलेल्या किडींमुळे पुन्हा दुसरा धक्का बसत आहे. जिल्ह्यात तुरीवर आता शेंगा पोखरणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तूर उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. गतवर्षी तुरीचे जादा उत्पादन तर यावर्षी शेंगा पोखरणार्‍या अळीमुळे उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात ७८ हजार १४९ हेक्टर तूर पिकाचे सरासरी क्षेत्र असताना त्यात यावर्षी वाढ झालेली आहे. ८४ हजार ९८0 हेक्टर क्षेत्रावर तूर पीक असून, सध्या शेंगा पक्वतेचा टप्पा तुरीने पार केला आहे. तर काही ठिकाणी तुरीच्या शेंगा वाळतही आहेत; मात्र सध्या तूर पिकावर शेंगा पोखरणार्‍या किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेंगा पोखरणार्‍या किडीची मादी सरासरी ६00 ते ८00 अंडी तुरीची कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगांवर वेगवेगळी घालतात. अंडी अवस्था तीन ते चार दिवसांची असते. अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीस सुस्त असून, कोवळी पाने व देठ कुरतडून खातात. सध्या ढगाळ वातावरण राहत असल्याने या किडींचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात आढळत आहे. पिसारी पतंग  नाजूक निमुळता १२.५ मि.मी. लांब करड्या, भुर्‍या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्रे पाडून खाते.  पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगेला शेंगेच्या बाहेर राहून खाते. शेंगमाशीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही; मात्र जेव्हा पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. छिद्रातून माशी बाहेर पडते, तेव्हा नुकसानीचा प्रकार आढळून येतो. सध्या या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कपाशीपठोपाठ तुरीवर किडींनी हल्ला केल्याने तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाला आहे. 

असे करा व्यवस्थापनतृणधान्य व तेलबिया पिकाबरोबर पिकाची फेरपालट करावी. हेक्टरी १0 कामगंध व २0 पक्षी थांबे पिकात उभारावीत. शेंगा पोखरणार्‍या अळीच्या नियंत्रणाकरिता ५ टक्के निंबोळी अर्क फवारावा. तसेच या किडीच्या नियंत्रणाकरिता आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास अझाडिरेक्टिन ३00 पीपीएम ५0 मि.ली किंवा क्लोरानट्रनिलीप्रोल १८.५ एस.सी ३ मिली इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा इथिऑन ५0 ईसी २0 मि.ली किंवा फ्लुबेंडामाइड ३९.३५ एससी २ मिली प्रति १0 लीटर पाण्यात मिसळून यापैकी एक घटकाची फवारणी करावी, अशी माहिती कृषी अधिकार्‍यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती