शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्के शाळा प्रगत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:35 IST

बुलडाणा जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ७४ टक्के शाळा प्रगत दाखवण्यात आल्या आहेत.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी हातभार लागत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४ टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत. यातूनच गुणवत्तापूर्ण शिक्षणावरही भर दिल्या जात आहे.वाचन, लेखन, संख्या ज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या क्षमतांची परिपूर्ण तयारी झाल्यास ज्ञानग्रहण आणि आकलनाचा मार्ग सुलभ होतो. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा पाया कच्चा राहतो. प्रत्येक विद्यार्थ्याची पायाभूत संपादणुकीची नियमित पडताळणी करून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम २०१५-१६ पासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सर्व माध्यमांच्या शाळांमधून इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित विषयाच्या शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणुकीची खात्री शैक्षणिक प्रगती चाचणीद्वारे करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यातील ७५८ शाळाच प्रगत शाळांमध्ये होत्या. आता जिल्ह्यातील १ हजार १५८ शाळा प्रगत झाल्या आहेत. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी प्रगत शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

अप्रगत शाळांकडे विशेष लक्षजिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ७४ टक्के शाळा प्रगत दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उर्वरित २६ टक्के शाळांमध्ये ३९९ शाळांचा समावेश आहे. ३९९ शाळा अप्रगतमध्ये मोडतात. त्यामुळे या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अप्रगत शाळा प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आता इंग्रजी भाषा समृद्धीकरणप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी २०१९-२० या वर्षात इंग्रजी भाषा विषय समृद्धीकरणावर भर देण्यात येत आहे. राज्यातील ६ हजार १७० समूह साधन केंद्रांना (केंद्रीय शाळा) इंग्रजी भाषा विषय समृद्धीकरणासाठी पूरक शैक्षणिक साहित्य संचन पुनर्प्रत्ययी आदेशाने उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने नव्या सत्रातील शाळा सुरू होण्यापूर्वीच मान्यता दिली. विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी २०१९-२० या वर्षात १० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचण्या, गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येत आहे. यातून अनेक शाळा आयएसओ, डिजिटलही झाल्या. यंदा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शाळेत राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रही जिल्ह्यात उभारण्यात येत आहेत.- डॉ. श्रीराम पानझाडे,शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा