शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बुलडाणा जिल्ह्यात १.९३ लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:33 IST

बुलडाणा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९३ हजार ९५१ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९३ हजार ९५१ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़.  तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेवून शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत वाढवून ३१ जुलै केली होती. दाने दिवसांच्या या मुदतवाढीचा जिल्ह्यातील १८ हजार २५६ शेतकºयांनी फायदा घेतला.प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९३ हजार ९५१ शेतकºयांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविला आहे. ५०३ कोटी ५ लाख २८ हजार ४८१ रूपयांची विमा राशी आहे. जिल्ह्यात यंदा कुठे दमदार तर कुठे साधारण पाऊस आहे.गत चार वर्षापासून शेतकºयांवर सतत अस्मानी संकटाचे मोठे सावट राहत असल्याने शेतकरी दरवर्षी पिकांचा विमा उतरवत असल्याचे दिसून येते. बहुतांश ठिकाणी आजही पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर बुलडाणा तालुक्यात अतिपावसाने अनेक शेतकºयांची पिकेच खरडून गेल्याचा प्रकार मागील महिन्यात घडला. त्यामुळे पिक खरडून गेलेल्या बहुतांश शेतकºयांनी पीक विमा उतरवला आहे.गेल्यावर्षी २ लाख ६७ हजार २९९ शेतकºयांनी १ लाख ९६ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रावरी पिकांचा विमा उतरवला होता. त्यापैकी ३ हजार ७८१ लाभार्थी शेतकºयांना २.३४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

बँकेत चकरामागील वर्षी २ लाखावर शेतकºयांनी खरीप हंगामाचा पीक विमा उतरवला होता. दरम्यान, शासनाने दुष्काळही जाहीर केला. त्यामुळे गतवर्षी विम्याचा लाभ अनेक शेतकºयांना अद्यापपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी वारंवार बँकेत चकरा मारताना दिसून येत आहेत. गतवर्षीच्या विम्याची शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे.

विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण मिळणार.

विमा हप्ता किती?खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकºयांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता शेतकºयांना भरावा लागणार आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी